adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अवकाळी पाऊस व गारपिटीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; कृषिमंत्री दत्ता मामा भरणे यांचे निर्देश

अवकाळी पाऊस व गारपिटीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; कृषिमंत्री दत्ता मामा भरणे यांचे निर्देश  मुंबई/जळगाव, प्रतिनिधी :  (संपादक -:- ...

अवकाळी पाऊस व गारपिटीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; कृषिमंत्री दत्ता मामा भरणे यांचे निर्देश 


मुंबई/जळगाव, प्रतिनिधी : 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

राज्यात तसेच जळगाव जिल्ह्यात मे आणि जून २०२६ दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात कृषिमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी पंचनामे जलदगतीने व अचूकपणे पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले. बैठकीस पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले (व्हीसीद्वारे), आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल जावळे, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सुरज मांढरे (व्हीसीद्वारे), कृषी संचालक (विस्तार) रफीक नाईकवडी, कृषी संचालक विनयकुमार आवटे, जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे, भारतीय कृषी विमा कंपनीचे मुख्य प्रबंधक अजित कुमार, उपव्यवस्थापक अतुल झनकर तसेच सुनील पाटील उपस्थित होते. बैठकीत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये सुमारे ६१ हजार ४ हेक्टर क्षेत्र नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झाले असून त्यापैकी १८ हजार १२१ हेक्टर क्षेत्र केळी पिकाखालील आहे. जळगाव, बुलडाणा, सोलापूर, पुणे, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. 

कृषिमंत्री दत्ता मामा भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त भागातील पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. विमाधारक आणि विमाविहीन अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद काटेकोरपणे घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आवश्यकतेनुसार ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वेक्षण पूर्ण करावे आणि नुकसानभरपाईची प्रक्रिया गतीमान करावी, असेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळावी आणि कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी कृषी, महसूल आणि विमा यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले. बैठकीदरम्यान केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून कार्यशाळांचे आयोजन करून केळी पिकावरील समस्यांवर उपाययोजना निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जळगाव येथील केळी संशोधन केंद्रात संशोधनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे, प्रशिक्षणार्थींसाठी निवास व्यवस्था आणि वाहने उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी कृषिमंत्री दत्ता मामा भरणे यांनी, "शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. प्रत्येक बाधित शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असे आश्वासन दिले.
— सुनील पाटील, वाळकी, ता. चोपडा, जि. जळगाव

No comments