adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नेशन महाराष्ट्र न्यूज इंम्पॅक्ट मोठा वाघोदा बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयात चौकशीसाठी अधिकारी दाखल चौकशी विनाच शेरा नोंद करून पथक माघारी?

 नेशन महाराष्ट्र न्यूज इंम्पॅक्ट मोठा वाघोदा बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयात चौकशीसाठी अधिकारी दाखल  चौकशी विनाच शेरा नोंद करून पथक माघ...

 नेशन महाराष्ट्र न्यूज इंम्पॅक्ट

मोठा वाघोदा बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयात चौकशीसाठी अधिकारी दाखल 

चौकशी विनाच शेरा नोंद करून पथक माघारी?



रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मोठा वाघोदा बुद्रुक येथील ग्रामपंचायत ची आर ओ शुद्ध पाणी पुरवठा योजना उद्घाटनाच्या प्रतीक्षेत !साडे आठ लाख रुपयांची १५वा वित्त आयोगाच्या निधीतून बसविण्यात आलेले दोन आर ओ शुद्ध पाणी पुरवठा मशिन ८ महिने उलटूनही अद्यापही तहानलेली असल्याचे बातमी पत्र नेशन महाराष्ट्र न्यूज मध्ये प्रकाशित करण्यात आले होते हे वृत्त प्रसारित होताच रावेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी त्यासंबंधी लक्ष केंद्रित केले व दोन विस्तार  अधिकाऱ्यांचे चौकशी पथक मोठा वाघोदा बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात चौकशी कामी पाठविल्याचे समजते! रावेर पंचायत समितीचे ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी श्री अंढागळे यांनी तक्रारीत नमूद आर ओ शुद्ध पाणी वाटर कुलर ची दोन्ही ठिकाणच्या प्लॅन्टची पाहणी केली दरम्यान दोन्ही ठिकाणच्या आर ओ मशिन बंद स्थितीत व अपुर्ण अवस्थेत दिसून आले तदनंतर ग्रामपंचायत प्रशासनाने सदर वाटर कुलर पाणी भरून थंड होण्यासाठी सुरू केले   मात्र हा सदर प्रकार पाहता ही पाणी पुरवठा योजना बंदच असल्याचे स्पष्ट झाले  


यासोबतच नागरिकांनी केलेल्या तक्रारीतील डसबीन खरेदी, महीला प्रशिक्षण,वॉटर व्हॉल दुरुस्ती,जि प मराठी शाळा सोलर प्लॅन्ट पॅनल खरेदी, बसस्थानक परिसरातील अंदाजित ९ लाख रुपये खर्चून अपुर्ण राहीलेली गटार बांधकाम, गावात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे तसेच पेव्हर ब्लॉक खरेदी किमतीत तफावत? कागदोपत्री जास्त मात्र जमीनीवर काम कमी! मागासवर्गीय विकास कामासाठी ४लाख ८०हजारांचा खर्च केला गेला आहे मात्र मागासवर्गीय च अज्ञभिन्न असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे व हा निधी कुठे कोणी व काय कामी खर्च केला? हे न समजणारे कोडं आहे,!


ग्राम निधी व १५वा आयोगाच्या निधीतून खर्च करण्यात आलेल्या लाखों रुपयांची कामे व प्रशिक्षण साहित्य खरेदी तफावत असल्याचे नागरिकानी आरोप केलेल्या तक्रारींची दखल चौकशी गुलदस्त्यातच असल्याचे समजते ? संबंधित रावेर पंचायत समितीचे दोन्ही विस्तार अधिकारी यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी ग्रामपंचायत विषयी नागरिकांच्या असलेल्या तक्रारींची तसेच अपुर्ण घरकुल योजनेच्या चौकशी कामी आम्ही आले असल्याचे सांगितले मात्र आवश्यक ते दस्तावेज व आवश्यक कागदपत्रे समक्ष उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचे कारण सांगत १५वा वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करण्यात आलेल्या सर्व कार्यारंभ आदेश अदा केलेली बीले केलेल्या कामांची कंम्लीशन रिपोर्ट,व केलेल्या कामांची माहिती रावेर पंचायत समितीच्या कार्यालयात सादर करण्याबाबत शेरे बुक मध्ये नोंद केली असल्याचे विस्तार अधिकारी श्री अंढागळे व प्रविण शिंदे यांनी सांगत वेळ मारुन नेली असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त केले जात आहे 

जर याच प्रकारे जनसामान्यांच्या तक्रारींची चौकशी केली जात असेल आणि जनतेच्या सोयीसुविधा करीता असलेल्या निधीचा अपहारावर पांघारुण घातले जात असेल तर सर्वसाधारण जनतेने न्याय मागायचा तरी कोणाकडे?हा सवाल सुज्ञ नागरिकांना पडला आहे!तरी सदर प्रकरणी जळगांव जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष कार्यतत्पर शिस्तप्रिय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष वेधून जनसामान्यांच्या तक्रारींचे निवारण करावे व आवश्यक ती चौकशी होऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी मोठा वाघोदा बुद्रुक वासियांसह तक्रार दार नागरिकांतून होत आहे 

रावेर पंचायत समितीचे चौकशी अधिकारी यांनी दरम्यान थंड पेय पिऊन चौकशी थंड बस्त्यात ठेवून ग्रामपंचायत कार्यालयातून काढता पाय घेतला!


क्रमशः भाग २

No comments