adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी संदीप रमेश पाटील. रामानंद पोलीस स्टेशन येथून बदलीने फैजपूर येथे नियुक्ती

 फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी संदीप रमेश पाटील. रामानंद पोलीस स्टेशन येथून बदलीने फैजपूर येथे नियुक्ती   रावेर प्रतिनिधी...

 फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी संदीप रमेश पाटील.

रामानंद पोलीस स्टेशन येथून बदलीने फैजपूर येथे नियुक्ती  


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जळगांव जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच जारी केले यामध्ये जळगांव येथील रामानंद पोलीस स्थानकात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप रमेश पाटील यांची बदली झाली असून त्यांना फैजपूर पोलीस स्टेशनच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे 

सपोनि संदीप पाटील यांची शिस्तप्रिय शिस्तबद्ध कार्यपध्दती गुन्हेगारांचे कर्दनकाळ सज्जनांचे खंबीर साथी यासोबतच कायद्याचे काटेकोरपणे अंमलबजावणी व पालन करणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात 

त्यांनी कर्तव्य बजावताना अनेक गुन्ह्यांमध्ये कुशलतेने कर्तव्य निभावले आहे आणि अनेक गुन्हे उघडकीस आणलेले आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल या उक्तीप्रमाणेच गुन्हेगारांवर वचक निर्माण केली आहे 

सपोनि संदीप पाटील यांनी आपलं कर्तव्य काळात मुंबई, जळगांव सारख्या शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये चोखपणे ईमान ऐतबारे सेवा बजावली आहे.आता त्याची नियुक्ती फैजपूर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी पदी नियुक्ती मिळाल्याने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील राहतील तसेच गुन्हेगारी वृत्ती चा बिमोड करण्यात नक्कीच यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील असतील 

फैजपूर शहराची ओळख एकता एकात्मता समता बंधुता जातीय सलोखा अबाधित असून एकोप्याने टिकून आहे व नक्कीच आपल्या प्रेमळ मनमिळावू स्वभावामुळे नूतन सपोनि संदीप रमेश पाटील अबाधित राखतील यात काही एक शंका नाही त्यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा फैजपूर, सावदा सह परिसरातील नागरिकांनी दिल्या

No comments