adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल येथील सूतगिरणीला मोठी आग लागल्याने अंदाजे १ कोटी रुपयांचे नुकसान.

 यावल येथील सूतगिरणीला मोठी आग लागल्याने अंदाजे १ कोटी रुपयांचे नुकसान. भरत कोळी यावल  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल सूतगिरणीच्या गोदामा...

 यावल येथील सूतगिरणीला मोठी आग लागल्याने अंदाजे १ कोटी रुपयांचे नुकसान.


भरत कोळी यावल 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल सूतगिरणीच्या गोदामाला आग लागल्यामुळे अंदाजे १ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे यावल नगरपरिषद अग्निशामक बंब तसेच सावदा येथील अग्निशामक बंब यांनी आग आटोक्यात आणण्याकरिता प्रयत्न केले.स्थानिक नागरिकांनी तात्काळ येऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. सूतगिरणी मध्ये सौर ऊर्जा प्लेट बसवण्याचे काम सुरू असताना वेल्डिंग करीत असताना उडालेल्या ठीणगी पडल्याने. सदरची आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे,कापूस गाठी तसेच मशिनरीचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे, त्यामुळे यात सर्व साहित्य कापूस गाठी वगैरे धरून एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. मशिनरी तपासणी महसुल विभाग करीत आहेत,या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने सहकार्य करीत होते.यावल तहसील कार्यालयाकडून घटनास्थळावर तलाठी पवन कुमार नवगाळे सूतगिरणीचे मालक डॉक्टर खाचणे यांच्या पत्नी सोनम शैलेशा खाचणे यांच्यासह शहरातील नगरसेवक उमेश फेगडे,राजू वाणी यावल नगरपालिकेचे अधिकारी कोल्हे यांचे सह अनेकांनी भेटी दिल्या.आगीचा पंचनामा करण्यात आला आहे.

No comments