मलकापूर शहर पोलिसांची मोठी कारवाई; चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक, ३ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त अमोल बावस्कार बुलढाणा: (संपादक -:- हेम...
मलकापूर शहर पोलिसांची मोठी कारवाई; चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक, ३ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त
अमोल बावस्कार बुलढाणा:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर शहर पोलीसांनी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून तब्बल ३ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दिनांक २७ जून २०२६ रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करताना पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तपासाची चक्रे फिरवली.चोरीच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपींचा शोध घेण्यात आला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यामध्ये १) रेहान साबीर शेख अहमद (वय ३२ वर्षे),२) जावेद खान,३) मो. सोहेल मो. रफीक,(वय २९ वर्षे)यांचा समावेश आहे.आरोपींकडून विविध चोरीच्या गुन्ह्यातील साहित्य जप्त करण्यात आले असून त्यामध्ये हाऊस वायर, कृषी साहित्य, प्लंबिंग साहित्य, महावितरण कंपनीची केबल तसेच चारचाकी/दुचाकी वाहनांचा समावेश आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे ३ लाख ९० हजार रुपये आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मेश्राम तांबे, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी सोनम माटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.डी.बी. पथकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल मलकापूर शहर पोलिसांचे कौतुक होत आहे. पुढील तपास मलकापूर शहर पोलीस करीत आहेत.

No comments