adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

साहित्यिक राजु बाविस्कर यांचा लासुर जन्मगावी आज सत्कार

 साहित्यिक राजु बाविस्कर यांचा लासुर जन्मगावी आज सत्कार  चौगाव (विश्राम तेले) (संपादक-:-  हेमकांत गायकवाड) लासुर ता चोपडा येथील मुळ रहिवासी ...

 साहित्यिक राजु बाविस्कर यांचा लासुर जन्मगावी आज सत्कार 


चौगाव (विश्राम तेले)

(संपादक-:-  हेमकांत गायकवाड)

लासुर ता चोपडा येथील मुळ रहिवासी असलेले आणि नुकताच त्यांच्या " काळया निळ्या रेषा " या साहित्यकृतीस साहित्य अकादमीचा  पुरस्कार प्रदान करण्यात आलेले, लासूर गावाचे सुपुत्र साहित्यिक व चित्रकार राजु बाविस्कर यांचा जन्मगावी आज दि १४ रोजी रविवारी सकाळी ठिक अकरा वाजता श्री नाटेश्वर मंदिर येथे सत्कार करण्यात येत आहे. लासुर व परिसरातील राजु बाविस्कर यांनी लेखन केलेल्या या साहित्य लेखनास भारतीय साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण गावचे साहित्यप्रेमी व विविध संस्था मार्फत हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल हिम्मतराव पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच नर्मदाबाई भील, साहित्यिक अशोक कोतवाल, अहिराणी साहित्यिक सुभाष आहिरे, एम के भामरे, निवृत्त डी वाय एस पी राजेंद्र रायसिंग, प्रा ए के गंभीर ,अमृतराव वाघ उपस्थित राहणार आहेत . साहित्य प्रेमी प्रा युवराज बेडीस्कर, भीकन पाटील, यांना भागवत वाघ ,हरेंद्र बीडकर, विलास पाटील, कैलास महाजन, अकील ठोके ,विजय पाटील,लखीचंद ठाकरे, लखीचंद सोनवणे व ग्रामस्थ कार्यक्रम साठी परीश्रम घेत आहेत

No comments