adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लोणवडी येथे हिवताप जनजागरण मोहीम; डासांच्या नियंत्रणासाठी गप्पी मासे सोडण्याचा उपक्रम

 लोणवडी येथे हिवताप जनजागरण मोहीम; डासांच्या नियंत्रणासाठी गप्पी मासे सोडण्याचा उपक्रम  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) प...

 लोणवडी येथे हिवताप जनजागरण मोहीम; डासांच्या नियंत्रणासाठी गप्पी मासे सोडण्याचा उपक्रम 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पावसाळ्यात वाढणाऱ्या डासजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र उमाळी अंतर्गत लोणवडी येथे हिवताप जनजागरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान नागरिकांना हिवताप (मलेरिया), डेंग्यू, चिकुनगुनिया आदी आजारांबाबत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सविस्तर माहिती देण्यात आली.अकोला आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. अन्सारी, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. मंडाले,जिल्हा हिवताप अधिकारी श्री.चव्हाण, सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी श्री.पांडे, श्री. होगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जैन वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील, डॉ.बाठे,आरोग्य पर्यवेक्षक श्री.हुबड,आरोग्य निरीक्षक श्री. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी लोणवडी येथील समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) डॉ. सोहील सर व आरोग्यसेवक श्री. सरोदे यांनी नागरिकांना हिवताप, डेंग्यू व चिकुनगुनिया या आजारांची कारणे, लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत मार्गदर्शन केले.गावातील साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने गप्पी मासे सोडण्याचा उपक्रम राबविण्यात आला.गप्पी मासे डासांच्या अळ्या खाऊन त्यांची संख्या कमी करण्यास मदत करतात.त्यामुळे डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरत आहे.पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढते. त्यामुळे नागरिकांनी घर व परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, तसेच डासांपासून संरक्षणासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केले.आरोग्य विभागाच्या या जनजागरण मोहिमेमुळे लोणवडी परिसरात हिवताप व इतर डासजन्य आजारांवर नियंत्रण मिळविण्यास मदत होणार असून नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करून स्वच्छता राखावी,असे आवाहन करण्यात आले.



No comments