adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावलला सेवा दिलेले दोघे पोलिस निरीक्षक झाले डीवायएसपी; निरीक्षक रंगनाथ धारबळे यांची कारकिर्द म्हणजे पदोन्नतीचा मार्ग

 यावलला सेवा दिलेले दोघे पोलिस निरीक्षक झाले डीवायएसपी; निरीक्षक रंगनाथ धारबळे यांची  कारकिर्द  म्हणजे पदोन्नतीचा मार्ग   भरत कोळी यावल  (सं...

 यावलला सेवा दिलेले दोघे पोलिस निरीक्षक झाले डीवायएसपी; निरीक्षक रंगनाथ धारबळे यांची  कारकिर्द  म्हणजे पदोन्नतीचा मार्ग 


 भरत कोळी यावल 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल पोलीस ठाण्यात आपल्या कार्यकाळात कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि जनतेशी सुसंवाद राखणारे पोलिस निरीक्षक म्हणून ओळख निर्माण केलेल्या दोन अधिकाऱ्यांना राज्य शासनाने उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) पदावर पदोन्नती दिली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या यशामुळे यावल तालुक्यात आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

यावल पोलीस ठाण्याचे माजी पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांची पदोन्नती होऊन त्यांची डीवायएसपी, मालेगाव ग्रामीण येथे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे उघडकीस आणणे आणि जनतेशी सुसंवाद ठेवणे यामुळे त्यांनी वेगळी छाप पाडली होती.

त्याचप्रमाणे यावल पोलीस ठाण्यात सेवा बजावलेले सुधीर पाटील यांनाही उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) पदावर पदोन्नती मिळाली असून त्यांची साक्री, धुळे ग्रामीण येथे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या पदोन्नतीचेही पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.


या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या सेवाकाळात कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरीच्या जोरावर ही पदोन्नती मिळविल्याची भावना व्यक्त होत आहे. 

दरम्यान, सध्या यावल पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले रंगनाथ धारबळे . त्यांच्या कार्यपद्धती, गुन्हे उकलण्याची क्षमता आणि शिस्तबद्ध नेतृत्वामुळे त्यांनाही लवकरच डीवायएसपी पदावर पदोन्नती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यावल पोलीस ठाण्यात सेवा बजावलेल्या अधिकाऱ्यांचा पदोन्नतीचा गौरवशाली प्रवास कायम राहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

यावल पोलीस ठाण्याला लाभलेले हे सक्षम अधिकारी आज राज्यातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत असल्याने यावलकरांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली असून, पोलीस दलातील गुणवंत अधिकाऱ्यांच्या यशाचा हा प्रेरणादायी प्रवास असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी आपल्या कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि जनतेप्रती संवेदनशील कार्यशैलीमुळे अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण केली आहे. गुन्हे उघडकीस आणणे, नाकाबंदीतील सतर्क कारवाई, फरार आरोपींचा शोध, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय ठरले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली यावल पोलिसांनी अनेक महत्त्वपूर्ण कारवाया यशस्वीपणे पार पाडल्या असून नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास अधिक दृढ झाला आहे. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल वरिष्ठांकडून निश्चितच घेतली जाईल आणि भविष्यात त्यांना पदोन्नती मिळेल, अशी अपेक्षा नागरिक आणि सहकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

No comments