दिव्यांग अरविंद ढगे यांना मोफत वॉकर देऊन दिला मदतीचा हात.... द बेबीकेअर फाऊंडेशन व समाजसेविका रुचिता नाईक यांच्या कार्याचे सर्वस्तरातुन कौ...
दिव्यांग अरविंद ढगे यांना मोफत वॉकर देऊन दिला मदतीचा हात....
द बेबीकेअर फाऊंडेशन व समाजसेविका रुचिता नाईक यांच्या कार्याचे सर्वस्तरातुन कौतुक...
अमोल बावस्कार मुंबई
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नालासोपारा ता,२९ :- नालासोपारा पश्चिम येथिल दिव्यांग अरविंद ढगे हे दोन्ही पायाने दिव्यांग आहेत. वॉकर नसल्याने त्यांना दैनदिन जिवनात अडचणीचा सामना करावा लागत असल्याने त्यांना बाहेर जाण्या येण्यास जमत नसल्याने त्यांनी बहुजन विकास आघाडीचा रुचिता नाईक यांना वॉकर मिळण्याबाबत सहकार्य करण्याची मागणी करताच रूचिता नाईक व द बेबी केअर फांउडेशन यांच्या मदतीने मोफत वॉकर उपलब्ध करून देण्यात आली.
तसेच त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र व पेन्शन मिळवुन देण्यात येणार आहे. उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी मोफत रूग्णवाहिका हि उपलब्ध करून देण्यात आल्याचे रूचिता नाईक यांनी सांगितले. या कठिण परिस्थितीत केलेली मदतीमुळे त्यांचे मन भरून आले. त्यांनी सर्वांचे आभार मानले.यावेळी बहुजन विकास आघाडीचा रूचिता नाईक, अँलेक्स डेनियल सर, अमित नाईक उपस्थित होते.

No comments