फैजपुरात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम नागरिकांचा प्रचंड सहभाग आरोग्य सभापती हकीम तडवी यांची प्रमुख उपस्थिती इदू पिंजारी फैजपूर (संपादक : हेमक...
फैजपुरात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम नागरिकांचा प्रचंड सहभाग
आरोग्य सभापती हकीम तडवी यांची प्रमुख उपस्थिती
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर सर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू तडवी सर तसेच मुख्याधिकारी श्री. अविनाशजी गांगुर्डे सर यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर शहरात आज राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची उत्साहपूर्ण सुरुवात करण्यात आली. बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी नगरपरिषद फैजपूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा मा. श्रीमती दामिनीताई पवन सराफ, आरोग्य सभापती मा. हकीम ऐमत तडवी साहेब तसेच नगरसेवक श्री. पवन अनिल सराफ यांनी पोलिओ बूथला भेट देऊन मोहिमेचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.
या मोहिमेसाठी शहरात आरोग्य विभागामार्फत १६ पोलिओ बूथ, २ ट्रांझिट टीम आणि १ फिरस्ती (मोबाईल) टीम कार्यरत करण्यात आली आहे. या सर्व टीममध्ये ५४ स्वयंसेवक व ३ पर्यवेक्षक कार्यरत असून डॉ. खाचाने नर्सिंग महाविद्यालयाच्या ११ प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींनी देखील मोलाची सेवा दिली.
या मोहिमेदरम्यान फैजपूर शहरातील ० ते ५ वर्षे वयोगटातील सुमारे ३,८०० बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्याचे उद्दिष्ट आहे.
यावेळी आरोग्यवर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर सय्यद, पोलिओ पर्यवेक्षक श्री. चंदन पाटील, श्री. अशोक चौधरी, राजेश कोळी, श्री. विवेक इंगळे, आरोग्य सेविका सौ. आरती पाटील, सौ. अलका वैदकर, नगरपरिषद कर्मचारी सौ. सविता काटे, श्री. सागर सपकाळे तसेच इतर अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवक उपस्थित होते.
"प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब पोलिओमुक्त भारतासाठी आपला सहभाग अवश्य आहे

No comments