अंजाळे येथे 'मन की बात'च्या १३५ व्या भागाचे सामूहिक श्रवण संपन्न यावल प्रतिनिधी : भरत कोळी (संपादक : हेमकांत गायकवाड) आज अंजाळे येथ...
अंजाळे येथे 'मन की बात'च्या १३५ व्या भागाचे सामूहिक श्रवण संपन्न
यावल प्रतिनिधी : भरत कोळी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
आज अंजाळे येथील बूथ क्र. ३२२ वर पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाच्या १३५ व्या भागाचे दूरदर्शनवर सामूहिक श्रवण करण्यात आले. हा कार्यक्रम रमेश पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला.
यावेळी जि. प. सदस्य तथा गटनेते मा. श्री. प्रभाकर आप्पा सोनवणे, ग्रा. पं. सदस्य आनंद सपकाळे, अशोक सपकाळे, विलास सोनवणे, नितीन सपकाळे, रमेश पाटील, हर्षल पाटील आणि जगन बोदरू यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी मांडलेल्या विविध राष्ट्रीय, सामाजिक तसेच विकासाभिमुख विषयांचे उपस्थितांनी लक्षपूर्वक श्रवण केले. कार्यक्रमानंतर देशहिताशी संबंधित विविध विषयांवर उपस्थितांनी चर्चा केली. राष्ट्रनिर्मितीत प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

No comments