फैजपूरमध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्साहात प्रारंभ; नगरसेविका सुमैय्या शेख यांच्या हस्ते शुभारंभ इदू पिंजारी फैजपूर (संपादक : हेमकांत ...
फैजपूरमध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्साहात प्रारंभ; नगरसेविका सुमैय्या शेख यांच्या हस्ते शुभारंभ
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
फैजपूर, दि. २८ जून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शहरात रविवारी उत्साहात शुभारंभ करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू तडवी तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.
तहानगर येथील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे आयोजित पोलिओ बूथवर प्रभाग क्रमांक १ च्या नगरसेविका सुमैय्या शेख कुर्बान यांच्या हस्ते ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे "दोन थेंब" पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आरोग्यवर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर सय्यद, पोलिओ पर्यवेक्षक चंदन पाटील, राजेश कोळी, विवेक इंगळे, दिनेश महाजन, अंगणवाडी सेविका मालती कोल्हे तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि आशा सेविका उपस्थित होत्या.
या मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात येत आहेत. सर्व पालकांनी आपल्या बालकांना जवळच्या पोलिओ बूथवर घेऊन जाऊन पोलिओचा डोस अवश्य पाजावा आणि पोलिओमुक्त समाज घडविण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले.

No comments