सन्मानपत्र देऊन के.डी. चौधरी सर यांच्या कार्याचा गौरव गो भागवत कथेच्या सातव्या दिवशी 12 जून रोजी के डी चौधरी सर यांना सन्मानपत्र देऊन गौरव क...
सन्मानपत्र देऊन के.डी. चौधरी सर यांच्या कार्याचा गौरव
गो भागवत कथेच्या सातव्या दिवशी 12 जून रोजी के डी चौधरी सर यांना सन्मानपत्र देऊन गौरव करताना संत दिनेश बापू व समस्त गोभक्त
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा - के.डी. चौधरी सर अमृत महोत्सव समिती व संत जगनाडे जगदीश गोपाल गोशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने के डी चौधरी सर यांचे अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने श्रीराम नगर चोपडा येथे गो भागवत कथा 6 जून ते 12 जून या कालावधीत संत निलेश महाराज बिल्लीमोरा यांचे अमृतवाणी द्वारे संपन्न झाली. १२ जून कथेचा विश्राम दिवस,त्या दिवशी महाराजश्रीनी कथेचा विस्तार करून उपस्थित श्रोते वर्गांना मंत्रोचाराद्वारे आशीर्वाद प्रदान केले. यावेळी के डी चौधरी सर यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना गोभक्ताद्वारे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.श्री टी एम चौधरी, देवकांत चौधरी, लखन तेली, मोरे अप्पा, गौरव पाटील, सूर्यकांत चौधरी, राजेंद्र चौधरी आदी गो भक्तांनी संत निलेश बापू महाराज यांचे हस्ते सन्मान पत्र देऊन सन्मान केला.सन्मानपत्रात के डी चौधरी सर यांनी शिक्षक, पत्रकार सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, म्हणून केलेल्या कार्याचा गौरव केला. उत्सव समितीचे अध्यक्ष श्री टी एम चौधरी सर यांनी अतिशय ओजस्वी शब्दात के.डी. चौधरी यांच्या कार्याचा गौरव केला. शिक्षक ते नामवंत कीर्तनकार हा प्रवास थक्क करणारा असल्याचे नमूद केले. गावापासून ते थेट देश पातळीवर समाजसेवा दीपावणारी आहे. न थकणारे व्यक्तिमत्व. तरुणांना प्रोत्साहन देणारे व्यक्तिमत्व अशा शब्दात उल्लेख केला. समाज व इतर सर्व समाजात त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.यावेळी संत श्री महाराज श्री यांनी के.डी. चौधरी सर यांना पिताश्रीची उपमा देऊन सन्मान केला. यावेळी श्री राजेंद्र गणपत चौधरी, श्री श्याम लोहार,के. डी.चौधरी सर यांची सून सौ प्रिया सूर्यकांत चौधरी, मुलगा सूर्यकांत कालिदास चौधरी, सतीश आबा पाटील आदींची समायोजित भाषणे झालीत. के डी चौधरी सर यांनी उपस्थितांचे आभार मानताना आपले वागणे गवताप्रमाणे सहनशील, वृक्षाप्रमाणे सहिष्णू, स्वतःला लहान समजून इतरांचा सन्मान व परमेश्वराचे नामस्मरण या मार्गाने जीवन मार्गक्रमित केल्यास जीवनात दुःख येणार नसल्याचे नमूद करून निरपेक्ष भावनेने सेवा हाच जीवनात आनंद देणारा मार्ग स्वीकाराला तो आपणही स्वीकारावा असे नमूद केले.संत निलेश बापू यांनी शेवटी सत्याने वागा व सर्वांशी गोड बोला असे सांगून आशीर्वाद दिले.शेवटी सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

No comments