एम पी जे संघटना आक्रमक शासन आदेशानंतरही फैजपूरमध्ये अतिक्रमण रखडले फैजपूर प्रांतअधिकारी व मुख्य अधिकारी यांना निवेदन प्रांतअधिकारी व म...
एम पी जे संघटना आक्रमक शासन आदेशानंतरही फैजपूरमध्ये अतिक्रमण रखडले
फैजपूर प्रांतअधिकारी व मुख्य अधिकारी यांना निवेदन प्रांतअधिकारी व मुख्य अधिकारी यांना निवेदन
इदू पिंजारी फैजपुर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर, महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार १ जानेवारी २०११ पूर्वीच्या निवासी अतिक्रमणांचे नियमन करण्यासाठी राज्यभर प्रक्रिया राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात जळगाव जिल्हाधिकारी यांनी दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी सर्व नगर परिषदांना कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून दिला होता. मात्र, या आदेशानंतरही फैजपूर नगर परिषद क्षेत्रात संबंधित प्रक्रिया अद्याप सुरूच झालेली नसल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी बबन काकडे फैजपूर विभाग तसेच बांधकाम विभाग चे मुख्य अभियंता राकेश बहिरम द्वारा मुख्याधिकारी फैजपूर नगर परिषद यांना निवेदन देण्यात आले. विशेष म्हणजे सकाळी साडेदहा वाजता कार्यालयीन वेळ सुरू झाल्यानंतरही दोन्ही अधिकारी(अविनाश गांगोडे तथा बबन काकडे) कार्यालयात उपस्थित नसल्याचे दिसून आले. संबंधित कर्मचाऱ्यांकडून विचारणा केली असता, "अतिक्रमण नियमन संदर्भात केवळ बैठक झाली असून प्रत्यक्ष मैदानावर कोणतीही कार्यवाही अद्याप सुरू झालेली नाही," अशी माहिती देण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार एप्रिल ते जुलै २०२६ या कालावधीत माहिती संकलन, अतिक्रमणांची यादी तयार करणे, मोजणी, प्रस्ताव तयार करणे व अंतिम निर्णय प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, निर्धारित मुदत संपूनही फैजपूर नगर परिषदेकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने पात्र अतिक्रमणधारक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
निवेदनामध्ये शासन निर्णय व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तात्काळ समिती गठीत करून सर्वेक्षण, मोजणी व प्रस्ताव तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत कोणती कार्यवाही करण्यात आली याचा सार्वजनिक खुलासा करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, शासनाच्या स्पष्ट निर्देशांनंतरही प्रक्रिया रखडल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करतात का, याकडे फैजपूरकरांचे लक्ष लागले आहे.
निवेदन देताना एम पी जे जळगाव जिल्हा अध्यक्ष मुस्तकीन खान,जिल्हा उपाध्यक्ष शेख अहमद मुल्ला शहर अध्यक्ष रहिमदिन, महेबुब खान, छबू तडवी,अरमान तडवी,जावेद अहमद काझी तथा फिरोज खान उपस्थित होते.

No comments