तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमआयडीसी पोलिसांचा मटका अड्ड्यांवर मोठा छापा..! ६ वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई..१० आरोपी ताब्यात! सचिन मोकळं ...
तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमआयडीसी पोलिसांचा मटका अड्ड्यांवर मोठा छापा..! ६ वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई..१० आरोपी ताब्यात!
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- शहर व परिसरात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांच्या थेट आदेशानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत धडक मोहीम राबवली.दि.०१/०६/२०२६ रोजी वेगवेगळ्या ६ ठिकाणी सुरू असलेल्या अवैध मटका अड्ड्यांवर अचानक छापे टाकून पोलिसांनी एकूण १ लाख ४५ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.या धडक कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध मटका जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती.या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि. माणिक चौधरी यांना कारवाईचे आदेश दिले.आदेश मिळताच सपोनि.चौधरी यांनी पोलीस पथकासह तोफखाना हद्दीतील निश्चित केलेल्या ६ वेगवेगळ्या संशयास्पद ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले.या धडक कारवाईत पोलिसांनी जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण १,४५,१७०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सर्व आरोपीं विरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे एकूण ०६ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि. माणिक बी.चौधरी,सफौ.राकेश खेडकर,पोहेकॉ.राजू सुद्रिक, पोकॉ.किशोर जाधव,पोकॉ. नवनाथ दहिफळे,पोकॉ.सुरज देशमुख आणि पोकॉ.उमेश शेरकर यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

No comments