नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई, कर्जमाफी आणि विशेष आर्थिक मदत जाहीर करावी -शमिभा पाटील...
नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई, कर्जमाफी आणि विशेष आर्थिक मदत जाहीर करावी -शमिभा पाटील
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर–यावल तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची वादळी पावसामुळे झालेली अवस्था अत्यंत वेदनादायक आहे. हजारो एकरांवरील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या, अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक काही तासांच्या नैसर्गिक संकटात उद्ध्वस्त झाले. परंतु हा प्रश्न केवळ नैसर्गिक आपत्तीचा नाही. जर केळीला वेळेत फळपिकाचा दर्जा मिळाला असता, तर शेतकऱ्यांना विमा संरक्षण, नुकसानभरपाई आणि विविध शासकीय योजनांचा अधिक प्रभावी लाभ मिळू शकला असता. वारंवार मागणी करूनही राज्यकर्त्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले नाही. लोकप्रतिनिधींनीही शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या विषयावर आवश्यक ती भूमिका घेतली नाही.
आजची परिस्थिती ही केवळ वादळी पावसाची देण नाही, तर राज्यकर्त्यांच्या उदासीनतेची आणि लोकप्रतिनिधींच्या शेतकरीविषयक अनास्थेचीही परिणती आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या अश्रूंवर सहानुभूती व्यक्त करणे पुरेसे नाही; त्यांच्या हिताचे निर्णय वेळेत घेणे ही शासनाची जबाबदारी आहे. रावेर– यावल परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे, नुकसानभरपाई, कर्जमाफी आणि विशेष आर्थिक मदत जाहीर करावी. तसेच केळी उत्पादकांच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी आवश्यक धोरणात्मक निर्णय त्वरित घेण्यात यावेत.
"शेतकऱ्यांचे नुकसान हे केवळ एका पिकाचे नुकसान नसते; ते संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर झालेला आघात असतो."असे मत शमिभा पाटील जिल्हाध्यक्ष, जळगाव पूर्व
वंचित बहुजन आघाडी यांनी व्यक्त केले आहे यासोबतच त्यांनी रावेर यावल तालुक्यातील नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई, कर्जमाफी आणि विशेष आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे

No comments