adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ॲड. जगदीश दादा कापडे यांचे निधन निष्ठावान नेतृत्व हरपल्याने शिवसैनिकांमध्ये शोककळा

 शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ॲड. जगदीश दादा कापडे यांचे निधन निष्ठावान नेतृत्व हरपल्याने शिवसैनिकांमध्ये शोककळा वरणगाव प्रतिनिधी अरुण धनगर (संपाद...

 शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ॲड. जगदीश दादा कापडे यांचे निधन

निष्ठावान नेतृत्व हरपल्याने शिवसैनिकांमध्ये शोककळा


वरणगाव प्रतिनिधी अरुण धनगर


(संपादक : हेमकांत गायकवाड)


 शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख, ज्येष्ठ नेते तथा नामांकित विधिज्ञ ॲड. जगदीश दादा कापडे यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने भुसावळसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून शिवसैनिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

          शिवसेनेच्या संघटनात्मक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ॲड. कापडे यांनी ग्रामीण भागात पक्ष विस्तारासाठी सातत्याने काम केले. संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी गावागावांत कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करण्यावर भर दिला. पक्षाशी अखेरपर्यंत निष्ठावान राहिलेल्या या नेतृत्वाने अनेक चढ-उतारांच्या काळात शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.

           कायदे क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ अनेक कार्यकर्त्यांना मिळाला. विविध आंदोलनांदरम्यान किंवा राजकीय संघर्षाच्या काळात अडचणीत सापडलेल्या शिवसैनिकांना कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यासाठी ते पुढाकार घेत असत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आत्मीयता निर्माण झाली होती.

           त्या काळात विद्यमान पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, स्व. राजेंद्रजी दायमा, संजय कोलते, गोविंदराव मांडवगणे, पत्रकार सुनील देशपांडे, पत्रकार सदाशिव गायकवाड, विलास सेठ मुळे, ॲड शाम गोंदेकर , सुभाष पाटील( कठोरा), सुभाष चौधरी, माजी सरपंच स्व. सुकलाल धनगर, स्व गणेश वंजारी,स्वर्गीय प्रेमराज वंजारी, स्व. जितेंद्र देवघाटोळे, स्व. मंगलशेठ धनगर,स्व. श्याम माळी, माजी उपसरपंच स्व. संतोष चौधरी (अंजनसोंडा ), महेंद्र शर्मा, सोपान वंजारी, रघुनाथ धनगर यांच्यासह अनेक जुन्या शिवसैनिकांनी संघटना उभारणीसाठी योगदान दिले होते.शिवसेनेच्या विचारांनी भारावलेल्या व योगदान दिलेल्याची यादी फार मोठी होऊ शकते हे शिवसैनिक म्हणजे वाघ होते ते वाघाची डरकाळी कापडे दादांच्या हिमतीवर फोडत होते हे सर्वश्रुत आहे या नेतृत्वाच्या फळीतील एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून ॲड. कापडे यांच्याकडे पाहिले जात होते.

               राजकारणाबरोबरच कायदे क्षेत्रातही त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. सामाजिक प्रश्नांवर त्यांनी नेहमीच स्पष्ट भूमिका मांडली. त्यांच्या निधनामुळे सामाजिक, राजकीय आणि विधी क्षेत्रात एक अनुभवी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

            ॲड. कापडे दादा यांच्या निधनाबद्दल विविध राजकीय, सामाजिक व कायदे क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला असून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व कापडे परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना सर्व स्तरांतून करण्यात येत आहे. :::

No comments