मौजमजा करण्यासाठी बाईक चोरणाऱ्या अट्टल चोराच्या तोफखाना पोलिसांनी आवळल्या मुसक्या..६ लाख ६० हजारांच्या १२ मोटारसायकली जप्त..! सचिन मोकळं ...
मौजमजा करण्यासाठी बाईक चोरणाऱ्या अट्टल चोराच्या तोफखाना पोलिसांनी आवळल्या मुसक्या..६ लाख ६० हजारांच्या १२ मोटारसायकली जप्त..!
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- मौजमजा करण्यासाठी शहरातून दुचाकी चोरणाऱ्या एका सराईत चोराला तोफखाना पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल ६ लाख ६० हजार रुपये किमतीच्या एकूण १२ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.या धडक कारवाईमुळे तोफखाना पोलीस स्टेशनचे ४ गुन्हे आणि कोतवाली पोलीस स्टेशनचा १ गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने पोलीस निरीक्षक श्री.जगदीश भांबळ यांनी पेट्रोलिंग करून गुन्हे नियंत्रण व तपास करण्याचे पोलीस अंमलदारांना आदेश दिले होते.त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर व त्यांचे पथक पेट्रोलिंग करत असताना,एका इसमाकडे विना नंबरची मोटारसायकल मिळून आली.पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला असता तो पळून जाऊ लागला.पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता,त्याने आपले नाव कृष्णा उमेश अंतरकर (वय २१ वर्ष,रा. शिवशक्ती नगर,ता.पाथर्डी,जि. अहिल्यानगर) असे सांगितले. त्याच्याकडील मोटारसायकलबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.परंतु, पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने अहिल्यानगर शहरातून अनेक मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.
सदरची धडक कारवाई मा. पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे नगर शहर विभाग, अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली
तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.जगदीश भांबळ,पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर,पो.हे.कॉ.नितीन उगलमुगले,अरुण गांगुर्डे, भानुदास खेडकर,अब्दुलकादर इनामदार,सुधीर खाडे,पो.कॉ. सुमित गवळी,अविनाश बर्डे, सतिष त्रिभुवन,सुजय हिवाळे, भागवत बांगर,सतिष शिंदे, शाकीर सय्यद,बाळासाहेब भापसे,कपिल गायकवाड, म.पो.ना.जिजा खुडे,म.पो.कॉ. कल्पना अवसरे यांनी केली आहे.
तसेच या गुन्ह्याच्या तांत्रिक तपासाकामी दक्षिण मोबाईल सेलचे पो.कॉ.राहूल गुंडू,नितीन शिंदे,अरुण सांगळे यांनी योग्य ती मदत केली आहे.

No comments