adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पत्रकारांची जागृतता. रस्त्यावर झाडाच्या तुटलेल्या भल्या मोठ्या फांद्या श्रमदान करीत. तोडून रस्ता केला मोकळा

 पत्रकारांची जागृतता. रस्त्यावर  झाडाच्या तुटलेल्या भल्या मोठ्या फांद्या श्रमदान करीत. तोडून रस्ता केला मोकळा  महिनाभरापूर्वी च रोझोदा येथील...

 पत्रकारांची जागृतता. रस्त्यावर  झाडाच्या तुटलेल्या भल्या मोठ्या फांद्या श्रमदान करीत. तोडून रस्ता केला मोकळा 

महिनाभरापूर्वी च रोझोदा येथील तरुणाचा वृक्ष उन्मळून गेला जीव! 


मुबारक तडवी रावेर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक -ते वडगाव या महामार्गावरील एका झाडाच्या दोन दिवसांपूर्वी वादळात मोठं मोठ्या फांद्या तुटून महामार्गावरील निम्म्या रस्त्यात लोंबकळत होत्या व याच लोंबकळत असलेल्या मोठ्या फांद्या मुळे वाहन धारकांना या झाडाच्या फांद्याना विळखा घालून जीवघेणा प्रवास सुरू होता हा गंभीर प्रकार मोठा वाघोदा येथील पत्रकार मुबारक उर्फ राजू तडवी कमलाकर माळी दिव्य मराठी यांच्या निदर्शनास आणून दिली व दोन्ही ही वृत्तपत्र माध्यम प्रतिनिधींनी क्षणाचाही विलंब न करता सदर ठिकाणी भर उन्हात तुटलेल्या फांद्या तोडण्याचे साहित्य सोबत घेऊन झाडाच्या तुटलेल्या फांद्या तासभर श्रमदान करीत परिश्रम घेत झाडावर चढून लोंबकळत असलेल्या व तुटलेल्या फांद्या स्वतः तोडून रस्ता मोकळा केला दरम्यान हे कृती कर्तव्य बघून ये जा करणार्या वाहन धारकांनी आभार मानले.या कामी त्यांना जवळील गावातील शेतकरी प्रकाश हरी चौधरी व मुलगा केतन प्रकाश चौधरी व सामाजिक कार्यकर्ते मजहर शरीफ तडवी यांनी हातभार लावत मदत केली 


घटनेचे गांभीर्य लक्षात घेत केले श्रमदान.

महिनाभरापूर्वीच निंभोरा ते मोठा वाघोदा बुद्रुक गावाजवळ वृक्ष अंगावर पडून रोझोदा येथील नवयुवक तरुणाचा मृत्यू झाला होता याच बरोबर अनेक जणांना सावदा रावेर रस्त्यावर झाड, फांद्या अंगावर पडून जीव गमवावे लागले आहेत याचेच गांभीर्य लक्षात घेऊन पत्रकार कमलाकर माळी पत्रकार तथा माजी सरपंच मुबारक अली खाँ तडवी प्रकाश हरी चौधरी मजहर तडवी केतन प्रकाश चौधरी यांनी परिश्रम घेतले 


No comments