अहिल्यानगर मध्ये खळबळ अवैध वाळू माफियांनी पोलिसांच्याच अंगावर घातला थेट जेसीबी सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्य...
अहिल्यानगर मध्ये खळबळ अवैध वाळू माफियांनी पोलिसांच्याच अंगावर घातला थेट जेसीबी
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :- वाळू माफियांची मुजोरी आता पराकोटीला पोहोचली असून,थेट कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांवरच जीवघेणे हल्ले करण्याचे धाडस त्यांच्यात वाढले आहे. अशीच एक थरारक आणि धक्कादायक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात घडली आहे. ढाकणवाडी शिवारातील नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला चक्क जेसीबीखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.पाथर्डी तालुक्यातील ढाकणवाडी गावच्या शिवारात असलेल्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे वाळू उपसा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने रात्रीच्या सुमारास घटनास्थळी धाड टाकली.पोलिसांना पाहताच वाळू माफियांची पळापळ सुरू झाली.कारवाई करत असताना,पोलिसांना रोखण्यासाठी आणि तिथून पळून जाण्यासाठी एका मुजोर जेसीबी चालकाने थेट कारवाई करणाऱ्या पोलिसांच्याच अंगावर भरधाव वेगात जेसीबी घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अत्यंत सतर्कता दाखवत प्रसंगावधान राखल्यामुळे पोलीस कर्मचारी या जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले.मात्र,वाळू माफियांच्या या कृत्याने पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.या जीवघेण्या हल्ल्यानंतर पोलिसांनी मागे न हटता धडक कारवाई केली.घटनास्थळावरून पोलिसांनी १० लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.यामध्ये प्रामुख्याने दोन ट्रॅक्टर - ट्रॉली एक ब्रास बेकायदेशीर वाळू या कारवाईदरम्यान पोलिसांनी एका ट्रॅक्टर चालकाला रंगेहात पकडण्यात यश मिळवले आहे. अशोक अर्जुन शिरसाठ (वय- अंदाजे, रा. टेंभुर्णी, ता. शिरूर कासार, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

No comments