adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तडवी फैजपूरीयन्स गृपतर्फे वृक्षारोपण तडवीवाडा परिसर हिरवागार करण्याचा संकल्प; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तडवी फैजपूरीयन्स गृपतर्फे वृक्षारोपण तडवीवाडा परिसर हिरवागार करण्याचा संकल्प; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश   फ...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तडवी फैजपूरीयन्स गृपतर्फे वृक्षारोपण

तडवीवाडा परिसर हिरवागार करण्याचा संकल्प; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश 


 फैजपूर  इदू पिंजारी :

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर:- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत ‘तडवी फैजपूरीयन्स गृप’तर्फे इस्लामपूरा येथील तडवीवाडा मस्जिद समोरील परिसरात उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि निसर्ग संरक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

वाढते तापमान, बदलते हवामान आणि बिघडत चाललेले ऋतूचक्र यामुळे पर्यावरण संवर्धनाची गरज अधिक तीव्र झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन तडवी फैजपूरीयन्स गृपच्या सदस्यांनी एकत्र येत परिसरात हिरवळ वाढविण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतला.

या मोहिमेअंतर्गत मस्जिद समोरील मोकळ्या जागेत कडुनिंब, पिंपळ, करंज तसेच सावली व शोभा देणाऱ्या विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, केवळ वृक्षारोपण करून न थांबता या रोपांच्या संगोपनाची आणि नियमित देखभालीची जबाबदारीही गृपच्या सदस्यांनी स्वीकारली आहे.

यावेळी तडवीवाडा मस्जिदचे इमाम हजरत हाफिज इकबाल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “पर्यावरण संरक्षणासाठी केवळ एक दिवस झाडे लावणे पुरेसे नाही, तर ती जगवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. लावलेली झाडे भविष्यात परिसराला सावली, शुद्ध हवा आणि पर्यावरणीय संतुलन प्रदान करतील.”

या उपक्रमात तडवी फैजपूरीयन्स गृपचे पदाधिकारी, सदस्य, इस्लामपूरा परिसरातील नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गृपच्या या सामाजिक आणि पर्यावरणपूरक कार्याचे मस्जिद कमिटी तसेच परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि प्लास्टिकमुक्त परिसर निर्मितीसाठी सामूहिक शपथ घेतली.

No comments