adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लासुर येथे स्टेट बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना बँकिंग सुविधा व सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन

   लासुर येथे स्टेट बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना बँकिंग सुविधा व सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन  विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड...

  लासुर येथे स्टेट बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना बँकिंग सुविधा व सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन 


विश्राम तेले चौगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

लासुर, ता.चोपडा :  येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्टेट बँकेच्या वतीने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाखा व्यवस्थापक संकेत खोडवे यांनी ज्येष्ठ नागरिकांना बँकेच्या विविध योजना, सुविधा तसेच सायबर फसवणुकीपासून बचाव करण्याबाबत सविस्तर माहिती दिली. खोडवे यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या ठेवींवर विशेष व्याजदराचा लाभ मिळतो. तसेच स्टेट बँकेमार्फत पीक कर्ज, पीक विमा, अपघात विमा, वैयक्तिक विमा व विविध आरोग्यविषयक विमा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांचा उल्लेख करताना त्यांनी फोन, संदेश किंवा सोशल मीडियावरून येणाऱ्या संशयास्पद कॉल्स व मेसेजेसवर विश्वास ठेवू नये, असे सांगितले. बँकेकडून कोणत्याही खातेदाराला आर्थिक व्यवहारांसंदर्भात फोनवर गोपनीय माहिती विचारली जात नाही. त्यामुळे फसव्या कॉल्सना बळी पडू नये. कोणतीही शंका असल्यास थेट बँकेत येऊन खात्री करावी व वेळोवेळी केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात रोखपाल विनोद सैंदाणे तसेच बँकेचे कर्मचारी भूषण कुंभार, गणेश माळी आणि किशोर चौधरी यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य केले. यावेळी नाटेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीराम पालीवाल, सचिव देवीलाल बाविस्कर, नारायण बागुल, वासुदेव सोनार, दयाराम पाटील, प्रतिभा चौधरी, जिजाबाई पाटील, मथुराबाई पेंड्यामांग, भगवान महाजन, अक्काबाई चांभार, विठ्ठल मगरे आणि सुरेश बाबुराव माळी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त माहिती व मार्गदर्शन दिल्याबद्दल विक्रम जावरे यांनी बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे  आभार मानले 


No comments