adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लोकशाहीच्या काळ्या अध्यायाच्या स्मरणार्थ वरुडमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन आणीबाणीच्या काळातील संघर्ष व लोकशाही मूल्यांवर होणार मार्गदर्शन

 लोकशाहीच्या काळ्या अध्यायाच्या स्मरणार्थ वरुडमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन आणीबाणीच्या काळातील संघर्ष व लोकशाही मूल्यांवर होणार मार्गदर्शन...

 लोकशाहीच्या काळ्या अध्यायाच्या स्मरणार्थ वरुडमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन

आणीबाणीच्या काळातील संघर्ष व लोकशाही मूल्यांवर होणार मार्गदर्शन 


विनोद मेंढे - वरुड तालुका प्रतिनिधी: 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

भारताच्या लोकशाही इतिहासातील काळा अध्याय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणीबाणीच्या काळाच्या स्मरणार्थ भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा ग्रामीण (मोर्शी) यांच्या वतीने वरुड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

संत्रानगरी वरुड शहरातील आय.एम.ए. हॉल, पुसला रोड, वरुड येथे दि. २५ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.


या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा विदर्भ संघटक डॉ. उपेंद्रजी कोठेकर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार उमेश उर्फ चांदूभाऊ यावलकर यांची उपस्थिती राहणार आहेत.


यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा अमरावती जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष   रविराज देशमुख, जिल्हा सरचिटणीस प्रा. डॉ. सुमित पवार, तसेच आणीबाणी संयोजक  श्री आर्किटेक्ट राजेश्वर निस्ताने यांची उपस्थिती लाभणार आहे.


विशेष उपस्थिती म्हणून वरुड नगर परिषदेचे नगराध्यक्ष  ईश्वर सलामे व शेंदूरजनाघाट नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा वरखडे उपस्थित राहणार आहेत.


आणीबाणीच्या काळातील लोकशाहीवरील परिणाम, संविधानाचे महत्त्व, लोकशाही रक्षणासाठी झालेला संघर्ष आणि त्या काळातील घटनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकशाहीप्रेमी नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी वरुड-मोर्शी शहर व ग्रामीण कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.

वृत्त विशेष सहयोग

ज्येष्ठ पत्रकार प्रविण सावरकर

वरुड जि.अमरावती


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments