adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दरवर्षी पावसाळ्यात गौसीया नगर केजीएन नगर मधील रस्त्यावर होणाऱ्या चिखलमय परिस्थितीचे बोलके चित्र मोठा वाघोदा ग्रामपंचायत चे अल्पसंख्याक वस्तीतील रस्त्यांकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष यंदाच्या पावसाळ्यात ही गौसिया नगर केजीएन नगर, च्या रहिवाशांची रस्त्याविना त्रिधातिरपीट होणार ! नमाज साठी मशिदीत जाण्यासाठी नागरिक नमाजी बांधव पाण्याच्या डबक्यातून करतात पायपीट?

  दरवर्षी पावसाळ्यात गौसीया नगर केजीएन नगर मधील रस्त्यावर होणाऱ्या चिखलमय परिस्थितीचे बोलके चित्र  मोठा वाघोदा ग्रामपंचायत चे अल्पसंख्याक व...

 दरवर्षी पावसाळ्यात गौसीया नगर केजीएन नगर मधील रस्त्यावर होणाऱ्या चिखलमय परिस्थितीचे बोलके चित्र

 मोठा वाघोदा ग्रामपंचायत चे अल्पसंख्याक वस्तीतील रस्त्यांकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष 

यंदाच्या पावसाळ्यात ही गौसिया नगर केजीएन नगर, च्या रहिवाशांची रस्त्याविना त्रिधातिरपीट होणार !

नमाज साठी मशिदीत जाण्यासाठी नागरिक नमाजी बांधव पाण्याच्या डबक्यातून करतात पायपीट?


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक येथील निंभोरा रस्त्यावरील गौसीया नगर,केजीएन नगर मध्ये पक्के सिमेंट काँक्रीट,पेव्हर ब्लॉक तर सोडा पण साध्या मुरुम किंवा खडीकरणाचा ही रस्ता या दोन्ही बहुसंख्य मुस्लीम, आदिवासी,बहुजन समाजाला वहिवाट करण्यास ग्रामपंचायत तर्फे तयार करण्यात आलेले नाहीत? मात्र गावात रस्त्यावर रस्ते बनविण्यात ग्रामपंचायत प्रशासन मस्त असल्याचे चित्र मात्र स्पष्ट दिसत आहेत यामध्ये पुर्वीच्या एक किंवा दोन वेळा बनवून तयार केलेल्या सिमेंट काँक्रीट च्या सुसज्ज रस्त्यावर दुसर्यां /तिसऱ्या वेळी पेव्हर ब्लॉक बसवून एका रस्त्यावर ट्रिपल लेयर टाकून रस्ते तयार केले गेले असल्याचे जनसामान्यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे आणि मागास प्रवर्ग भागातील निंभोरा रस्त्यावरील गौसीया नगर केजीएन नगर पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे

 पाणी साचून रस्त्यावर तलाव सदृश परिस्थिती निर्माण होते केजीएन नगर,गौसीया नगर सह शेजारच्या वस्तीतील नागरिकांना गौसीया नगर मधील स्थित मशिदीत नमाज पठणासाठी जाण्यासाठी या साचलेल्या पाण्यातून जातांना तारेवरची कसरत करावी लागते गौसीया नगर केजीएन नगर पावसाळ्यात चिखलमय तर होतोच पण रस्त्यावर पाणी आहे की पाण्यात रस्ता आहे हेच समस्या निर्माण होते संबंधित परिसरातील नागरिकांनी रहिवाशांच्या वारंवार ची मागणी तक्रारी करुनही ग्रामपंचायत मोठा वाघोदा बुद्रुक ने या परिसरातील वार्ड क्रमांक ६मधील समस्यांकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले आहे?या ना त्या कारणाने मुद्दामहून नागरिकांच्या जिकिरीचे व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देणे अनिवार्य असूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.आणि आता पावसाळा सुरू झाला आहे तीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे तरी रस्त्यावर तशीच तलाव सदृश परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता मोठा वाघोदा बुद्रुक ग्रामपंचायत ने या गौसीया नगर केजीएन नगर,फातेमा नगर मधील रस्त्यावर पावसाळ्यापूर्वी खडीकरण किंवा रस्ते काँक्रीटीकरण करण्याची मागणी गौसीया नगर केजीएन नगर फातेमा नगर मधील रहीवाशांकडून होते आहे व याची ग्रामपंचायत ने दखल घेऊन तात्काळ मान्सून पुर्व रस्ते तयार करण्याची मागणी ही केली जात आहे

No comments