जळगावात कोळी जमात जातवैधता कार्यालय कायमस्वरूपी सुरू करा; आमदार अमोल जावळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी भुसावळ/यावल : भरत कोळी (संपादक : ह...
जळगावात कोळी जमात जातवैधता कार्यालय कायमस्वरूपी सुरू करा; आमदार अमोल जावळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
भुसावळ/यावल : भरत कोळी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र राज्यातील सर्व आदिवासी टोकरे कोळी, कोळी ढोर, महादेव कोळी, मल्हार कोळी व डोंगर कोळी जमातीतील बांधवांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी २३ फेब्रुवारी रोजी आझाद मैदान, मुंबई येथे 'राघोजी भांगरे प्रणित संघर्ष समिती'च्या वतीने तीव्र उपोषण छेडण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत, 'प्रवर्तन बहुद्देशीय संस्था, जळगाव' यांच्या अध्यक्षतेखाली यावल-रावेर परिसराचे लोकप्रिय आमदार माननीय अमोलभाऊ जावळे यांनी विधानभवनात कोळी बांधवांचे प्रश्न आक्रमकपणे मांडले. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन जळगाव येथे कोळी जमातीसाठी कायमस्वरूपी जात पडताळणी (जातवैधता) कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
मुंबईतील आंदोलनापूर्वी जळगाव जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, खासदार रक्षाताई खडसे, आमदार संजयभाऊ सावकारे, चंद्रकांतजी सोनवणे, राजूमामा भोळे, चंद्रकांतजी पाटील तसेच आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके यांना प्रत्यक्ष भेटून कोळी जमात बांधवांच्या वतीने निवेदने देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आमदार अमोलभाऊ जावळे यांनी तातडीने पावले उचलत थेट मुख्यमंत्र्यांकडे या महत्त्वाच्या प्रश्नाचा पाठपुरावा केला.
आमदार अमोलभाऊ जावळे यांनी कोळी जमातीसाठी केलेल्या या निस्वार्थ कार्याबद्दल आणि विधानसभेत आवाज उठवल्याबद्दल संपूर्ण कोळी जमात बांधवांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले व त्यांना पुढील राजकीय व सामाजिक कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भेट
या महत्त्वपूर्ण मागणीसाठी व निवेदनाचा पाठपुरावा करण्यासाठी भुसावळ तालुका अध्यक्ष राज साहेबराव पाटील, कुंदन सोनवणे सर, महेशभाऊ कोळी, नितीनभाऊ सपकाळे, खेमचंदभाऊ कोळी, मुकेशभाऊ कोळी योगेशभाऊ साळुंखे, हेमंतभाऊ सपकाळे, महेंद्र सपकाळे, प्रशांत तावडे, मधुकरभाऊ कोळी यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील व भुसावळ तालुक्यातील इतर सर्व प्रमुख कोळी जमात बांधवांच्या शिष्टमंडळाने आमदार अमोलभाऊ जावळे यांची भेट घेतली होती...l जळगांव मध्ये हे कार्यालय सुरू झाल्यास हजारो सर्व आदिवासी टोकरे कोळी, कोळी ढोर, महादेव कोळी, मल्हार कोळी व डोंगर कोळी जमातीतील बांधवांची होणारी ससेहोलपट आणि आर्थिक भुर्दंड थांबणार आहे, असा विश्वास समाज बांधवांनी याप्रसंगी व्यक्त केला.
No comments