चोपडा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:- सालाबाद प्रमाणे पुण्य...
चोपडा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:- सालाबाद प्रमाणे पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी यांच्या जयंती निमित्ताने चोपडा शहरात दिनांक ३१ मे रविवार रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील धनगर मढी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगरपालिका चोपडा आगारात पुतळा व प्रतिमाचे पुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले.सायंकाळी आयोजीत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार चंद्रकांत सोनवणे नगराध्यक्षा सौ नम्रता पाटील, उपनगराध्यक्ष पंकज बोरोले, मार्केट कमिटी चे चेअरमन नरेंद्र पाटील, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पोलीस निरीक्षक पवन देसले,नगरसेवक डॉ रोहन पाटील,दिपक माळी प्रविण देशमुख शरद पाटील, निशा जैन,आर एन पाटील,पं स चे माजी सभापती आत्मारामभाऊ म्हाळके, पुंडलिक महाजन, डॉ नरेंद्र शिरसाठ साखर कारखानाचे माजी व्हा चेअरमन गोपाल धनगर व्याख्याते प्रा विजय शिरसाठ.यावेळी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे व अरुण भाई गुजराथी यांनी राजमाता अहिल्यादेवींच्या कार्याचा गुणगाण केले तर यावेळी व्याख्याते प्रा विजय शिरसाठ यांनी आपले विचार मांडले.प्रास्ताविक नंदकिशोर सांगोरे यांनी केले तर सुत्रसंचलन प्रदिप नायदे यांनी केले,व आभार माजी नगरसेवक महेंद्र धनगर यांनी मानले .संध्याकाळी ६ वाजेनंतर धनगर वाड्यापासुन छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत शहरात भव्य मिरवणुक काढण्यात आली. तरी कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक महेंद्र धनगर, शाम धामोळे,उमेश शिरसाठ भगवान नायदे,डॉ सुभाष शिरसाठ, योगेश सोनवणे, सचिन सांगोरे,आबा शिरसाठ,सुरेश शिरसाठ, आर सी भालेराव, योगेश कंखरे,नंदलाल धनगर, सरपंच देविदास धनगर,गणेश सपनार, चंद्रकांत सुलताने,,गोपाल कंखरे दिपक बिर्हाडे,अरुण कंखरे, सुनील बागुले,शेतकी संघाचे संचालक सचिन धनगर, राहुल शिरसाठ,निखिल शिरसाठ विजय शिरसाठ,भुषण शिरसाठ,समाधान शिरसाठ,लहुष नायदे,दत्तु धनगर, प्रफुल्ल नायदे प्रविण सावळे,नवल धनगर, रमाकांत धनगर,भुपेंद्र धनगर, जगदीश धनगर,नितीन पाकळे किरण निनायदे, ज्ञानेश्वर धनगर अनिता शिरसाठ,छाया शिरसाठ सुशिलाताई शिरसाठ,बबिता धनगर सह तालुक्यातील समाज बांधव, महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments