adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात ▪️एच.एस.सी. परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार; शिक्षणातून समाज प्रगतीचा संदेश

 अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात ▪️एच.एस.सी. परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ...

 अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात

▪️एच.एस.सी. परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार; शिक्षणातून समाज प्रगतीचा संदेश 


विकास पाटील धरणगाव 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव : येथील अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एच.एस.सी. परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

     यामध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या अतिफा अजमल खान बेलदार हिने ८८.३३ टक्के गुण मिळवून संस्थेचे नाव उज्ज्वल केले. तसेच पठाण शबाना याकूब हिने ८२.१७ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर आसेमा बानो शेख जाकीर हिने ८०.८३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. याशिवाय परीक्षेत यश संपादन करणाऱ्या इतर गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अलीम शिरपूरकर, सचिव एजाज खान, शालेय समितीचे चेअरमन अकील काझी, साबिर मोमीन, तौसिफ पटेल, आलम खान, मुख्याध्यापक वसीमखान पठाण, नदीमखान पठाण, शेख वहिदाबी, शेख परवेज, मो. इस्माईल, इमरानखान शिकलीकर, खाटीक जलील, रमीज पटेल, मो. तय्यब खान, शानुद्दीन मोमीन यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना चेअरमन अलीम शिरपूरकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हटले आहे. जो शिक्षणरूपी हे अमृत पितो, तो अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर शिक्षण घ्यावे. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असून विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वातून संस्थेसह धरणगाव आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन श्री. शिरपूरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. संपूर्ण कार्यक्रम आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

No comments