adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भवाळे येथे कृषी विभागाच्या शेतीशाळेत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन

 भवाळे येथे कृषी विभागाच्या शेतीशाळेत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भवाळे, दि. ४ जून २०...

 भवाळे येथे कृषी विभागाच्या शेतीशाळेत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

भवाळे, दि. ४ जून २०२६ : मौजे भवाळे येथे क्रॉप सॅप (CROP-SAP) योजनेअंतर्गत मका पिकावरील शेतकरी शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. या शेतीशाळेत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, पीक व्यवस्थापन तसेच विविध शासकीय योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात म. कृ. अ. हातेड येथील श्री एन. डी. जाधव यांनी शेतीशाळेची संकल्पना आणि उद्दिष्टे स्पष्ट केली. उपकृषी अधिकारी श्री चेतन साळुंखे यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांना त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

तसेच सहायक कृषी अधिकारी श्री राहुल साळुंखे यांनी बीजप्रक्रियेचे महत्त्व आणि त्याची योग्य पद्धत समजावून सांगितली. सहायक कृषी अधिकारी श्री विलास मोरे यांनी बियाणे उगवण चाचणीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तर सहायक कृषी अधिकारी श्री मुकेश मोरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना एकात्मिक पीक व्यवस्थापन (ICM) संदर्भातील "टाळी" पद्धतीचे प्रशिक्षण दिले.

यावेळी गावाचे सरपंच श्री आनंदराव पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमात शेतकऱ्यांनी विविध कृषी विषयक प्रश्न विचारून अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेतले.

शेतीशाळेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळून मका पिकाचे उत्पादन वाढविण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

No comments