adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ग.स. सोसायटीच्या ३७ वर्षांच्या सेवेनंतर संजय पाटील सेवानिवृत्त; गौरव सोहळा उत्साहात

 ग.स. सोसायटीच्या ३७ वर्षांच्या सेवेनंतर संजय पाटील सेवानिवृत्त; गौरव सोहळा उत्साहात  चंद्रकांत पाटील विचखेडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) च...

 ग.स. सोसायटीच्या ३७ वर्षांच्या सेवेनंतर संजय पाटील सेवानिवृत्त; गौरव सोहळा उत्साहात 


चंद्रकांत पाटील विचखेडा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा: जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स. सोसायटी) जळगावच्या चोपडा शाखेतील शाखाधिकारी तथा घोडगाव येथील रहिवासी, माजी सरपंच आणि चोपडा सूतगिरणीचे संचालक संजय उत्तमराव पाटील हे अखंड ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मे २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त नुकताच चोपडा शाखेत गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपड्याचे माजी आमदार तथा चोपडा सूतगिरणीचे चेअरमन कैलास पाटील होते. यावेळी संजय पाटील यांचा स्वपत्नीक शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी चोपडा सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन प्रल्हाद पाटील, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते तथा माजी संचालक रमेश शिंदे, जळगाव माध्यमिक शिक्षक संघटनेचे नेते आर. एच. बाविस्कर, ग.स. सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा संचालक सुनील सूर्यवंशी, संचालक मंगेश भोईटे, योगेश सनेर, तज्ज्ञ संचालक एकनाथ पाटील, सूतगिरणी संचालक चंद्रकांत पाटील, प्रकाश रजाळे, रमाकांत बोरसे, शेतकी संघाचे माजी चेअरमन प्रल्हाद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कांतीलाल पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

तसेच घोडगाव येथील युवराज महाराज, अनिर सर, प्रा. विजयकांत पाटील, जितेंद्र पाटील, नाना ठाकरे, विजय रजाळे, विपुल बाविस्कर, सागर पाटील, चंद्रकांत सोनवणे, आनंदराव बोरसे, विभागीय अधिकारी दिलीप सपकाळे, शाखाधिकारी शीतल मोरे, स्मिता मोरे, शरद पाटील, जगन्नाथ बाविस्कर, उपशाखाधिकारी मीना तडवी, किरण सोनवणे, तुषार सूर्यवंशी, जितेंद्र सूर्यवंशी, स्वप्निल सोनवणे, निलेश साळुंखे, अनिता पाटील, अनिल बाविस्कर, सुरेश पाटील तसेच सोसायटीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संजय पाटील यांच्या प्रामाणिक, कर्तव्यदक्ष व लोकाभिमुख सेवाकार्याचा गौरव केला. ग.स. सोसायटीच्या प्रगतीत त्यांनी दिलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वप्निल पाटील, उज्वल शिंदे, योगेश बाविस्कर, ललित पाटील, राहुल गोड, पियुष पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विजयानंद शिंदे यांनी केले.

No comments