धर्मभावना दुखावल्याचा आरोप; नाजिया इलाही खान विरोधात फैजपूर पोलिस ठाण्यात तक्रार इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर, ...
धर्मभावना दुखावल्याचा आरोप; नाजिया इलाही खान विरोधात फैजपूर पोलिस ठाण्यात तक्रार
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर, दिल्ली येथील नाजिया इलाही खान हिने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मुस्लिम धर्म, धर्मगुरू तसेच हजरत मोहम्मद पैगंबर (स.) आणि मा. आयेशा (र.अ.) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचा आरोप करत फैजपूर पोलिस ठाण्यात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, संबंधित महिलेने सोशल मीडियावर विविध धार्मिक स्थळांबाबत व मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त आणि भडकाऊ विधाने करून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सदर तक्रारीवर आवेश भांजा, नगरसेवक, पै. शकील शेख, कुर्बान शेख (नगरसेवक) तसेच फैजपूर येथील अनेक सुशिक्षित नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तक्रार दाखल करण्यासाठी शेकडो नागरिक पोलिस ठाण्यात उपस्थित होते, अशी माहिती देण्यात आली. तक्रारदारांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी व अटक करावी, अशी मागणी केली आहे. तसेच, चार दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास फैजपूर मुस्लिम बांधवांच्या वतीने प्रांत कार्यालयावर हजारो पुरुष व महिलांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. पोलिस प्रशासनाकडून या तक्रारीची पडताळणी करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

No comments