adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उकळत्या तेलाने तरुणाचा खून; फरार महिला अखेर पोलिसांसमोर हजर!

 उकळत्या तेलाने तरुणाचा खून; फरार महिला अखेर पोलिसांसमोर हजर!  लातूर, जि. प्र.(उत्तम माने) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) उदगीर शहरातील निडेबन...

 उकळत्या तेलाने तरुणाचा खून; फरार महिला अखेर पोलिसांसमोर हजर! 


लातूर, जि. प्र.(उत्तम माने)

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

उदगीर शहरातील निडेबन परिसरात २४ वर्षीय तरुणाच्या तोंडावर उकळते तेल टाकून त्याचा निर्घृण खून केल्याच्या धक्कादायक प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या घटनेनंतर फरार झालेली आरोपी महिला अखेर २३ जून रोजी रात्री सुमारे ८ वाजता उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाली. तिच्या शरणागतीमुळे या गाजलेल्या खून प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला होता. उकळते तेल तोंडावर टाकल्याने गंभीर जखमी झालेल्या २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर आरोपी महिला फरार झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. तिचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली होती आणि विविध ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात येत होती.

पोलिसांचा वाढता दबाव, सातत्याने सुरू असलेली शोधमोहीम आणि तपासाचा वाढता फास यामुळे अखेर आरोपी महिलेला पोलिसांसमोर हजर व्हावे लागल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. सध्या पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू असून, खुनामागील नेमके कारण काय होते, दोघांमधील संबंध कसे होते आणि घटनेपूर्वी नेमक्या कोणत्या घडामोडी घडल्या याचा तपास केला जात आहे. आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, आता तपासातून या खळबळजनक हत्याकांडामागील संपूर्ण सत्य समोर येण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments