adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणास राष्ट्रीय चर्मकार महासंघाचापालकमंत्री गुलाबराव पाटील यांना घेराव व निवेदन

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणास राष्ट्रीय चर्मकार महासंघाचापालकमंत्री गुलाबराव पाटील यांना घेराव व निवेदन धरणगाव प्रतिनिधी  : विकास पाटील  (...

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणास राष्ट्रीय चर्मकार महासंघाचापालकमंत्री गुलाबराव पाटील यांना घेराव व निवेदन



धरणगाव प्रतिनिधी  : विकास पाटील 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

धरणगाव : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणास (SC Sub-Categorisation) विरोध दर्शवत राष्ट्रीय चर्मकार महासंघ, जळगाव जिल्हा यांच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील, यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, भारताच्या राज्यघटनेने अनुसूचित जातींना समान अधिकार व संरक्षण दिले असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उपवर्गीकरणाचा विषय चर्चेत आला आहे. मात्र, महाराष्ट्र शासनाने राज्यात उपवर्गीकरण लागू करू नये, अशी महासंघाची ठाम भूमिका आहे.

महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जाती समाजात फूट पडण्याची शक्यता असून, सामाजिक ऐक्याला धक्का बसू शकतो. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व संबंधित समाजघटकांशी चर्चा करून समाजहिताचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली.

मुख्यमंत्री तथा राज्य मंत्रिमंडळाने उपवर्गीकरणाबाबत निर्णय घेताना समाजाच्या भावना लक्षात घेऊन राज्यात उपवर्गीकरण लागू न करण्याचा निर्णय घ्यावा व अनुसूचित जाती समाजाला न्याय द्यावा, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास जी विसावे ,जिल्हाध्यक्ष गणेश माधव सुरवाडे, महानगराध्यक्ष भगवान बाविस्कर, युवक जिल्हाध्यक्ष दीपक अनुष्ठान, तालुकाध्यक्ष दयाराम मोरे , आनंद नेरकर, रतिलाल मोरे,राजेंद्र चित्ते, नारायण वाघ, सुनील विसावे, रवींद्र अहिरे, धर्मराज मोरे, संजय बंसी, दिलीप वाघ सर धरणगाव तालुकाध्यक्ष, अरुण नेरकर, रमाकांत नेरकर, पंकज खजुरे, संतोष वाघ, कल्पेश विसावे, मंगावसईकर , भिकन क्षीरसागर, मयूर शिरसागर यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनावर उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन शासनाकडे सादर करण्यात आले.

No comments