adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कुख्यात ‘घायवळ टोळी’ला मोठा धक्का..! मोक्क्यातील दोन 'मोस्ट वाँटेड' फरार गुंड अखेर अहिल्यानगर एलसीबीच्या जाळ्यात..

 कुख्यात ‘घायवळ टोळी’ला मोठा धक्का..! मोक्क्यातील दोन 'मोस्ट वाँटेड' फरार गुंड अखेर अहिल्यानगर एलसीबीच्या जाळ्यात..  सचिन मोकळं अहिल...

 कुख्यात ‘घायवळ टोळी’ला मोठा धक्का..! मोक्क्यातील दोन 'मोस्ट वाँटेड' फरार गुंड अखेर अहिल्यानगर एलसीबीच्या जाळ्यात.. 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

​अहिल्यानगर :- पुणे शहरातील गुन्हेगारी विश्वात दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात ‘घायवळ टोळी’ ला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ने मोठा दणका दिला आहे.‘मोक्का’ (MCOCA) सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन अट्टल आणि फरार आरोपींना पोलिसांनी कोल्हापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून अत्यंत थरारकपणे ताब्यात घेतले आहे.या कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात एकच खळबळ उडाली आहे.​या प्रकरणाची धक्कादायक पार्श्वभूमी अशी की,फिर्यादी विजयसिंह कल्याणराव गोलेकर (वय ४५,रा.सुर्वेवाडी, खर्डा,ता.जामखेड) यांना १२ मे २०२६ रोजी रोहित उर्फ बबलू बाबासाहेब गोलेकर (रा. खर्डा) याने व्हॉटसॲप कॉलद्वारे संपर्क साधला.

​"पुण्यात दाखल झालेल्या संघटित गुन्हेगारीच्या (मोक्का) गुन्ह्यात तू मला वाचवले नाहीस.तुझ्यामुळे माझे वाटोळे झाले आणि २० लाख रुपये खर्च झाले," असे म्हणत रोहितने फिर्यादींकडे २० लाख रुपयांच्या खंडणीची थेट मागणी केली.इतकेच नव्हे तर, पैसे न दिल्यास 'गोळ्या घालून जीवे मारू' अशी थेट धमकी दिली.याप्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे, मुख्य आरोपी रोहित उर्फ बबलू गोलेकर हा कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लपून बसल्याचे समोर आले.​एलसीबीच्या पथकाने तात्काळ कोल्हापूर गाठले.२१ जून २०२६ रोजी शहापूर हद्दीतील यड्राव फाटा परिसरात सापळा रचून रोहित उर्फ बबलू बाबासाहेब गोलेकर (वय २७) याला रंगेहाथ बेड्या ठोकल्या. त्याने खर्डा येथील खंडणीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

​रोहितची चौकशी करत असतानाच पोलिसांना पुणे शहर पोलिसांच्या अभिलेखावरील दुसरा मोक्क्यातील फरार आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माऊली दगडू तोंडे (वय ४०,रा.खेचरे,ता. मुळशी,जि.पुणे) हा मिरजगाव शिवारातील सोलापूर ते अहिल्यानगर महामार्गावरील उड्डाणपुलाखाली थांबल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने तात्काळ तिथे धाव घेऊन त्यालाही ताब्यात घेतले.​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हे दोन्ही आरोपी पुणे शहर आणि परिसरात सक्रिय असलेल्या कुख्यात घायवळ टोळीचे सक्रिय सदस्य आहेत.​रोहित उर्फ बबलू गोलेकर: याच्यावर एकूण ०७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुणे शहरातील वारजे माळवाडी आणि कोथरुड पोलीस ठाण्यात त्याच्यावर मोक्का (MCOCA) अंतर्गत गुन्हे दाखल असून तो फरार होता.

​ज्ञानेश्वर उर्फ माऊली तोंडे: याच्यावर एकूण ०६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. कोथरुड पोलीस ठाण्यातील दोन वेगवेगळ्या मोक्का आणि आर्म्स ॲक्ट (शस्त्र अधिनियम) गुन्ह्यांत तो पोलिसांना हवा होता.​आरोपी रोहित गोलेकर याच्याविरुद्ध अहिल्यानगरच्या खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा तपासावर असल्याने त्याला खर्डा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे,तर दुसरा आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माऊली तोंडे याला पुढील तपासासाठी पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.​ही धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांच्या थेट सूचना व मार्गदर्शनाखाली,एलसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,उपनिरीक्षक अनंत सालगुडे,पोलीस अंमलदार राहुल द्वारके,फुरकान शेख, शामसुंदर जाधव,राहुल डोके, अमोल आजबे,मनोज साखरे, प्रशांत राठोड,सतिष भवर आणि चालक महादेव भांड यांच्या पथकाने केली आहे.

No comments