adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अहिल्यानगरमध्ये खळबळबळ! ५२० किलो गोमांसासह दोघे रंगेहाथ गजाआड..कोतवाली पोलिसांची धडक कारवाई..!

 अहिल्यानगरमध्ये खळबळबळ! ५२० किलो गोमांसासह दोघे रंगेहाथ गजाआड..कोतवाली पोलिसांची धडक कारवाई..! सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गा...

 अहिल्यानगरमध्ये खळबळबळ! ५२० किलो गोमांसासह दोघे रंगेहाथ गजाआड..कोतवाली पोलिसांची धडक कारवाई..!


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर :- कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंशियांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.कोतवाली पोलिसांनी झेंडीगेट परिसरातील व्यापारी मोहल्ला येथे छापा टाकून तब्बल १ लाख ६ हजार २०० रुपये किमतीचे ५२० किलो गोमांस जप्त केले असून, याप्रकरणी दोन आरोपींना रंगेहाथ अटक केली आहे.या धडक कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार,२१ जून २०२६ रोजी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (पोसई) प्रवीण पाटील हे गुन्हे शोध पथकासह पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते.दरम्यान,कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना एका विश्वसनीय गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की,व्यापारी मोहल्ला,झेंडीगेट येथे काही इसम गोवंशियांची कत्तल करून बेकायदेशीरपणे मांस विक्री करत आहेत आणि तातडीने गेल्यास ते रंगेहाथ मिळून येतील.माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तात्काळ पुढील कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने तात्काळ माहिती मिळालेल्या ठिकाणी जाऊन खात्री केली व झेंडीगेट येथील व्यापारी मोहल्ल्यात छापा टाकला असता,त्या ठिकाणी दोन इसम संशयास्पदरित्या मांस विक्री करताना रंगेहाथ आढळून आले.पोलिसांनी त्यांना जागीच रोखून त्यांची नावे व पत्ता विचारला असता त्यांनी आपली नावे सोहेल जावेद कुरेशी (वय २९ वर्षे,रा.बेपारी मोहल्ला, कुरेशी मशीद जवळ, झेंडीगेट, अहिल्यानगर),तौसिफ सादिक कुरेशी (वय ३६ वर्षे, रा. बेपारी मोहल्ला, कुरेशी मशीद जवळ, झेंडीगेट,अहिल्यानगर) असे सांगितले.पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून १,०६,२०० रुपये किमतीचे एकूण ५२० किलो गोमांस, एक वजनकाटा आणि सत्तूर असा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे.याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुरज दिलीप कदम (बक्कल नं.२५७३) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस अंमलदार रोहिणी दरंदले करत आहेत.ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (नगर शहर विभाग) श्री.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली,कोतवालीचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या सूचनेनुसार पोसई. प्रवीण पाटील, पोहेकॉ. राहुल शिंदे, मपोहेकॉ. रोहिणी दरंदले, पोहेकॉ. विनोद बोरगे, पोहेकॉ. साबीर शेख, पोहेकॉ. दौड, पोहेकॉ. विशाल दळवी, पोकॉ. दिपक रोहकले, शिरीष तरटे, सुरज कदम, सत्यम शिंदे, दत्तात्रय कोतकर, सचिन लोळगे, अतुल काजळे, अमोल गाडे, महेश पवार, रमेश शिंदे, संकेत धिवर, अतुल लाटे आणि मपोकॉ.पल्लवी रोहकले यांनी केली आहे.

No comments