लोकसंवाद नारीशक्ती गौरव पुरस्काराने कविताताई इंगळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान लोकसंवाद गुणगौरव पुरस्कार २०२६ सोहळ्यात न...
लोकसंवाद नारीशक्ती गौरव पुरस्काराने कविताताई इंगळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान 
लोकसंवाद गुणगौरव पुरस्कार २०२६ सोहळ्यात नारीशक्ती गौरव पुरस्कार स्वीकारताना कविताताई इंगळे व अन्य पुरस्कारार्थी.
पल्लवी पाटील खामगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
खामगाव : येथून प्रकाशित होणाऱ्या सांज दैनिक लोकसंवाद चर्चापत्र यांच्या वतीने आयोजित गुणगौरव पुरस्कार २०२६ सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
यावेळी विराट मल्टिपर्पज फाउंडेशनच्या जिल्हाध्यक्ष कविताताई इंगळे यांना नारीशक्ती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच आनंद कीलोलीया यांना युवा समाजसेवक पुरस्कार, तर खामगाव तालुका पटवारी संघाचे अध्यक्ष सुमित गवई यांना शासकीय सेवेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. जनसेवक ऋषिकेश उन्हाळे यांनाही पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याशिवाय जळगाव जामोद येथील प्रसिद्ध कवी चंद्रकांत शिंदे, संघर्ष ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दशरथ घुले, तसेच दिव्यांग चळवळीसाठी कार्यरत असलेले दिव्यांग शक्तीचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार मनोज नगरनाईक यांना दिव्यांग सेवक पुरस्कार व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.
समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या व्यक्ती, समाजसेवक आणि संस्थांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतो. शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता, समाजसेवा तसेच शासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार वितरण सोहळ्यास खामगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, खामगाव क्लबचे अध्यक्ष किशोरदादा भोसले, भाजपा बुलढाणा जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख, भाजपा महिला तालुकाध्यक्ष श्रद्धाताई धोरण, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख, प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. शेरेकर, रील स्टार संध्या पहुरकर, लोकसंवाद चर्चापत्रचे मुख्य संपादक मंगेश बहरूपी, उपसंपादक अमोल जाधव व संदीप पहूरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
No comments