स्वराज्य पोलीस मित्र संघटनेचे मार्गदर्शन शिबीर उत्साहात संपन्न खोपोली प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) स्वराज्य पोलीस मित्र पत्र...
स्वराज्य पोलीस मित्र संघटनेचे मार्गदर्शन शिबीर उत्साहात संपन्न
खोपोली प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे व संस्थापक व मुख्य महासचिव कमलेश शेवाळे तसेच महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा सौ धनश्री ताई उत्पात व संचालक तथा रायगड जिल्हाध्यक्षा सौ दमयंतीताई कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली काल रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे नियुक्तीपत्र वाटप व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे आणि खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष कुलदीप शेंडे हे होते. या कार्यक्रमासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे व संस्थापक व मुख्य महासचिव कमलेश शेवाळे तसेच संचालक तथा कोकण विभाग अध्यक्ष रविंद्र करंगुटकर, संचालक तथा पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदीप जाधव, माल्तेश सर, प्रमोद हिगे, पत्रकार मिलिंद टेमकर, मंतोष मिश्रा हे मान्यवर उपस्थित होते. पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी सांगितले आहे रायगड जिल्हा हा आपत्ती विभागात येतो तेव्हा सर्व पोलीस मित्रांचे सहकार्य अपेक्षित आहे आणि पोलीस मित्रांना काही अडचण आली तर निश्चितच पोलीस स्टेशनची मदत मिळेल. त्यानंतर नगराध्यक्ष कुलदीप शेंडे यांनी संघटनेचे कौतुक केले तसेच संघटना जे समाजकार्य करत त्याबद्दल नेहमीच अभिमान वाटतो असे सांगितले. त्यानंतर दिपक कांबळे, कमलेश शेवाळे, रविंद्र करंगुटकर यांनी संघटने बद्दल माहिती सांगितली व मार्गदर्शन केले. ह्या मार्गदर्शन शिबीरात खोपोली शहर उपाध्यक्ष वर्षा साळुंके, अशोक पालांडे, लक्ष्मण होळकर, गिता गौतम, ललित म्हात्रे, सतिश राणीम, हरजिंदर कौर, रितेश मोरे, मलखितसिंग विहाल, हनुमंत मानकर, वर्षा कदम, विजय शिंदे, विजय परदेशी, कल्पना कांबळे, मिना फिरके, रेणुका राठोड, अमित मोरे तसेच रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षा दिक्षा माने, ग्रामीण जिल्हाध्यक्षा प्रणिता घोलप, दक्षता मोरे, उल्का नार्वेकर, विनिता आरेकर, पुर्वा चव्हाण, मनिषा वगरे, रवीना जंगम, मधुरा भोपळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

No comments