भटक्या विमुक्त बहुजन संघामार्फत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न अरुण धनगर वरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भटक्या विमुक्त बहुज...
भटक्या विमुक्त बहुजन संघामार्फत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न
अरुण धनगर वरणगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भटक्या विमुक्त बहुजन संघाचे अध्यक्ष एडवोकेट शिरीष जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचा वाटप करण्यात आले. दिनांक 21/06/2026 रोजी मोजे कमळापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथे भटक्या विमुक्त बहुजन संघाचे अध्यक्ष शिरीष कुमार जाधव यांचा वाढदिवस भटक्या विमुक्त जाती जमातीतील लहान मुलांना शालेय साहित्य वाटप करून साजरा करण्यात आला. याप्रसंगी समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक रवींद्र गायकवाड, कैकाडी समाज आघाडीचे अध्यक्ष अरुण गायकवाड, जेष्ठ कार्यकर्ते दीपक जाधव, भटक्या विमुक्त बहुजन संघाचे राज्य संपर्कप्रमुख अरुण धनगर,महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सदस्य रामदास जाधव, कैकाडी समाज आघाडीचे नागेश जाधव, उदय गायकवाड, मनीष गायकवाड तसेच समाज बांधव हजर होते.
विशेषता कार्यक्रमासाठी दीपक जाधव नाशिक यांनी लागणारे साहित्य पुरवले व अरुण गायकवाड यांनी लहान मुलांना लागणाऱ्या कंपास पेटी, कलर साहित्य व इत्यादी वस्तू दिल्या. सदरील कार्यक्रम पूर्णतः नेण्यासाठी मनीष गायकवाड यांनी मेहनत घेतली. सदरील कार्यक्रमाला भटक्या व विमुक्त समाजातील पहिली ते दहावी वर्गातील 45 विद्यार्थी हजर होते. तसेच त्यांचे पालक हजर होते. सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी भटक्या विमुक्त बहुजन संघाचे अध्यक्ष एडवोकेट शिरीष कुमार जाधव यांचा सत्कार कैकाडी समाज आघाडीचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांनी यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला . तसेच रवींद्र गायकवाड, दीपक जाधव, रामदास जाधव यांचे समाज प्रबोधनपर भाषणे झाली.

No comments