बाल संस्कार विद्या मंदिरात योग दिन उत्साहात साजरा भरत कोळी यावल : (संपादक -:- हेमकांत गायकवाड) बाल संस्कार विद्या मंदिर यावल येथे दि.२१ ...
बाल संस्कार विद्या मंदिरात योग दिन उत्साहात साजरा
भरत कोळी यावल :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बाल संस्कार विद्या मंदिर यावल येथे दि.२१ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, श्री सुनील माळी व श्री अतुल गर्गे आणि सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध योगासने, प्राणायाम व ध्यान साधणा करून योगाचे महत्त्व जाणून घेतले.
श्री प्रशांत महाजन यांनी विविध प्रकारचे प्राणायाम योग यांचे प्रात्यक्षिक करून घेतले व महत्व सांगितले
योगामुळे शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास साधला जातो, तसेच निरोगी जीवनशैली अंगीकारण्यास प्रेरणा मिळते. विद्यार्थ्यांनी योगाभ्यास करत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक वाचनालय यावल यांनी जागा उपलब्ध करून दिली.
"योग करा, निरोगी रहा" हा संदेश देत कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली.आभार श्री अतुल पवार यांनी मानले

No comments