दापका ग्रामपंचायत कारभार दगडगाव–काळभैरव मंदिर पाणंद रस्ता कामात नातेवाईकांची मस्टरवर नावे? ग्रामस्थांकडून निष्पक्ष चौकशीची मागणी... उत्तम ...
दापका ग्रामपंचायत कारभार
दगडगाव–काळभैरव मंदिर पाणंद रस्ता कामात नातेवाईकांची मस्टरवर नावे?
ग्रामस्थांकडून निष्पक्ष चौकशीची मागणी...
उत्तम माने लातूर (प्रतिनिधी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दापका ग्रामपंचायत अंतर्गत मंजूर असलेल्या दगडगाव मेन रोड ते काळभैरव मंदिर या दोन किलोमीटर पाणंद रस्ता कामाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. शेतकरी आणि ग्रामस्थांच्या सुविधेसाठी मंजूर झालेल्या या कामात मजूर मस्टरवर सरपंच कुटुंबाशी संबंधित व्यक्तींची नावे असल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत असून संपूर्ण परिसरात या विषयाची चर्चा रंगू लागली आहे.
सदर कामास दिनांक १८ जुलै २०२४ रोजी मंजुरी मिळाली असून या कामासाठी १८ लाख ६१ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. गावकऱ्यांच्या अपेक्षेनुसार या निधीतून शेतकरी आणि नागरिकांच्या उपयोगाचा दर्जेदार पाणंद रस्ता उभा राहणे अपेक्षित होते. मात्र आता उपलब्ध कागदपत्रांमधील नोंदींमुळे आणि प्रत्यक्ष परिस्थितीबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत असल्याचे दिसून येत आहे.
उपलब्ध माहितीनुसार शबनम सुलेमान शेख, रा दुर्गा नगर दापका मस्टर नंबर(MH-21-004-023-001/1085)सरपंच पतीच्या आत्याची सुन) ,श्रीमती आशा अहमदमिया देशमुख राहणार शिंदाळा तालुका औसा जिल्हा लातूर यांचा मास्टर क्रमांक पटेल(MH-21-004-023-001/1087),सरपंच आत्या सासू) रजीन हुसेन पटेल (MH-21-004-023-001/339),(सख्खा दिर), श्रीमती रेश्मा पाषा पटेल (MH-21-004-023-001/528)(जाऊ), समीर हुसेन पटेल(MH-21-004-023-001/531),(दिर) ताजोद्दीन हुसेन पटेल (सरपंच पती) (MH-21-004-023-001/530) आणि सानिया लालासाब पटेल (MH-21-004-023-001/532)सरपंच पुतणी) यांची नावे संबंधित मस्टरमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय परवीन राजू पटेल,(सरपंच यांच्या जाऊबाई) पाशा हुसेनसाब पटेल,(दिर) फिरदोस समीर पटेल, (जाऊबाई) फतरुमाबी हुसेनसाब पटेल,सरपंच यांच्या सासूबाई) कलीमुनबी खाँजासाब मुल्ला (चुलत आत्या सासू),समुयाबी जब्बार मुल्ला(अत्यासासूची सुन ) अकबर इकबाल पटेल,(चुलत दिर )इकबाल दाऊद पटेल,(चुलत सासरा )सिकंदर इकबाल पटेल,(चुलत दिर ) रिहाना इकबाल पटेल,(चुलत सासू) सलीम कमाल पटेल(चुलत दिर) आणि यांची नावेही मस्टरमध्ये असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
(विशेष म्हणजे ताजोद्दीन हुसेन पटेल हे सरपंच पती,ग्रामपंचायत सदस्य तसेच स्वस्त धान्य दुकानदार) असून पाशा हुसेन पटेल हे लांबोटा सोसायटीचे चेअरमन असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अशा व्यक्तींची नावे मस्टरमध्ये दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या विषयी ग्रामस्थांचे म्हणणे आहे की शासनाचा निधी हा सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी असतो. गावातील अनेक गरजू मजूर रोजगाराच्या प्रतीक्षेत असताना जर एकाच कुटुंबाशी संबंधित व्यक्तींची नावे मोठ्या प्रमाणात मस्टरमध्ये आढळत असतील, तर त्याची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. कामावर प्रत्यक्ष किती मजूर होते, मस्टरवरील व्यक्तींनी प्रत्यक्ष काम केले का, मजुरीची रक्कम कोणाच्या खात्यात जमा झाली आणि कामाचे प्रत्यक्ष मोजमाप किती झाले, या प्रश्नांची उत्तरेजनतेला मिळाली पाहिजेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या कामी इतर व्यक्तीच्या मस्टरवर मिळून एकूण रक्कम ०९लाख ६६ हजार ७३५ रुपये उचलण्यात आले आहेत.
यामुळे गावात सध्या एकच चर्चा सुरू आहे की, जनतेच्या पैशातून मंजूर झालेल्या कामाचा लाभ खऱ्या गरजूंना झाला की नाही? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी संपूर्ण मस्टर, बँक व्यवहार, कामाचे मोजमाप आणि प्रत्यक्ष स्थळ पाहणीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित ग्रामपंचायत प्रशासन किंवा संबंधित पदाधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.मात्र या प्रकरणामुळे दापका ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून ग्रामस्थांमध्ये पारदर्शक चौकशीची मागणी अधिक तीव्र होत आहे.
No comments