सावेडीत उपनगरात थरार! 84 वर्षीय आजोबांची मिनिटाभरात सोन्याची चैन अन् अंगठ्या गायब..तोतया पोलिसांचा कारनामा वाचा सविस्तर.. सचिन मोकळं अहिल्...
सावेडीत उपनगरात थरार! 84 वर्षीय आजोबांची मिनिटाभरात सोन्याची चैन अन् अंगठ्या गायब..तोतया पोलिसांचा कारनामा वाचा सविस्तर..
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :- तुम्ही संध्याकाळी वॉकला जाताय का? आणि अचानक समोर पोलीस येऊन उभे ठाकले तर? नक्कीच तुमचा पोलिसांवर विश्वास बसेल. पण थांबा! अहिल्यानगरमध्ये याच विश्वासाचा गैरफायदा घेत एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल ७० हजारांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या या 'तोतया' पोलिसांचा सुळसुळाट झाला असून,यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
(The Modus Operandi)
अष्टविनायक कॉलनी (पाईपलाईन रोड) येथे राहणारे ८४ वर्षीय गणपतराव विष्णू पंदारे हे नेहमीप्रमाणे संध्याकाळी मोकळ्या हवेत फिरण्यासाठी बाहेर पडले होते.ते अष्टविनायक कॉलनीच्या कमानीजवळ पोहोचलेच होते,तितक्यात पाठीमागून एका दुचाकीवर दोन अनोळखी तरुण आले.
"आम्ही पोलीस आहोत...पुढे भयंकर चेकिंग सुरू आहे. तुमच्या गळ्यातील चेन आणि हातातील अंगठ्या काढून खिशात ठेवा..." असा रुबाब या तोतया पोलिसांनी गणपतरावांसमोर केला.समोर खाकीचा अंगावर येणारा तोरा पाहून ८४ वर्षांचे आजोबा घाबरले आणि त्यांनी भामट्यांवर विश्वास ठेवला.भयभीत झालेल्या गणपतरावांनी स्वतःच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन आणि हातातील ४० हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या काढून त्या भामट्यांच्या हातात दिल्या. या लुटारूंनी हातचलाखी करत खऱ्या सोन्याच्या ऐवजी खोट्या अंगठ्या गणपतरावांच्या हातात टेकवल्या आणि 'गणेश बुक एजन्सी' समोरून दुचाकीवरून सुसाट पळ काढला.काही वेळाने जेव्हा आजोबांनी हात तपासून पाहिले,तेव्हा आपल्याला भलत्याच खोट्या अंगठ्या मिळाल्याचं आणि आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.तोपर्यंत खूप उशीर झाला होता.या घटनेनंतर परिसरात एकच गर्दी जमली होती.एका सुजाण नागरिकाने तातडीने गणपतरावांच्या मुलाला फोन करून माहिती दिली.या प्रकरणी गणपतराव पंदारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लुटारूंपैकी एका आरोपीचे वय साधारण ३५ ते ४० वर्षे असून, त्याने अंगात पांढरा शर्ट घातला होता. या प्रकरणाचा तपास तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गिरी करत आहेत.

No comments