adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नवलभाऊ कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याची चुंचाळे गावात कृषी जागृकता व औद्योगिक करणानुभव योजना

 नवलभाऊ कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याची चुंचाळे गावात कृषी जागृकता व औद्योगिक करणानुभव योजना  भरत कोळी यावल ता. प्र. (संपादक -:- हेमकांत...

 नवलभाऊ कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याची चुंचाळे गावात कृषी जागृकता व औद्योगिक करणानुभव योजना 


भरत कोळी यावल ता. प्र.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

नवलभाऊ कृषी महाविद्यालय, अमळनेर येथील कृषी पदवीच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी जागृकता व कृषी औद्योगिक करणानुभव योजना (RAWE & AIA) अंतर्गत  यावल तालुक्यातील  चुंचाळे येथे दिनांक  ५ जून २०२६  या कालावधीत  शैक्षणिक भेट व प्रात्यक्षिक उच्चारित उपक्रम राबवला. 

या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या शेतीविषयक समस्या, गरजा व उपलब्ध संसाधनांचा अभ्यास केला. मृदा परीक्षण, पिकनियोजन, सेंद्रिय शेती, जलसंवर्धन, कीड व रोग व्यवस्थापन, पशुपालन, कुक्कुटपालन, बागायती शेती तसेच कृषी प्रक्रिया व मूल्यवर्धन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी शेतात भेट देऊन प्रात्यक्षिके दाखवली व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. तसेच कृषी औद्योगिक संधी व उत्पन्न्रवाढीचे नवे मार्ग याबाबतही माहिती दिली. या उपक्रमामुळे गावातील शेतकरी व तरूणांमध्ये कृषीविषयक जागृकता निर्माण झाली.

या उपक्रमासाठी गावकर्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी महाविद्यालयाचे प्रा.प्रो.नरेंद्र बोरसे, कार्यक्रम समन्वयक प्रो.गिरीश पाटील तसेच चुंचाळे लोकनियुक्त सरपंच नौशाद तडवी ग्रामपंचायत सदस्य तलाटी तडवी म्याडम यांचे मार्गदर्शन लाभले.एकुण बारा आठवडे हा उपक्रम राबवला जाणार आहे.                             या उपक्रमाची वैशिष्टये 

शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद

शेतभेटी व प्रात्यक्षिके

कृषी विषयक मार्गदर्शन व प्रशिक्षण

कृषी औद्योगिक संधींची माहिती

ग्रामविकासासाठी शैक्षणिक योगदान

No comments