adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अहिल्यानगरमध्ये खळबळ: हॉटेलमधील वाद मिटवणाऱ्या तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या एक गंभीर जखमी अल्पवयीन आरोपीने केला थरकाप उडवणारा हल्ला बारा बाभळी परिसरातील ‘शौर्य’ हॉटेलमधील घटना

 अहिल्यानगरमध्ये खळबळ: हॉटेलमधील वाद मिटवणाऱ्या तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या एक गंभीर जखमी ​अल्पवयीन आरोपीने केला थरकाप उडवणारा हल्ला ब...

 अहिल्यानगरमध्ये खळबळ: हॉटेलमधील वाद मिटवणाऱ्या तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या एक गंभीर जखमी

​अल्पवयीन आरोपीने केला थरकाप उडवणारा हल्ला बारा बाभळी परिसरातील एका’ हॉटेलमधील घटना 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

​अहिल्यानगर :- एका हॉटेलमध्ये पैशांच्या कारणावरून सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करणे एका तरुणाला भयंकर महागात पडले आहे. वाद घालणाऱ्या १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात दोघांवर चाकूने प्राणघातक हल्ला केला.या भीषण हल्ल्यात एका तरुणाची छातीत चाकू भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली,तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला असून तो रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.नगर-पाथर्डी रस्त्यावरील बारा बाभळी परिसरातील 'एका' हॉटेलमध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास ही थरारक घटना घडली.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

​सागर धोत्रे (वय अंदाजे २५ - ३०, मृत) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर निलेश चावरे हा तरुण या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे.याप्रकरणी भिंगार येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.दिलेल्या माहितीनुसार आणि फिर्यादी निलेश गायकवाड याने दिलेल्या तक्रारीनुसार,रविवारी रात्री निलेश गायकवाड,सागर धोत्रे आणि निलेश चावरे हे तिघे मित्र नगर-पाथर्डी रस्त्यावरील बारा बाभळी येथील ‘एका हॉटेल’ येथे जेवणासाठी गेले होते.जेवण आटोपल्यानंतर निलेश चावरे याने हॉटेलचे बिल भरले.त्यानंतर हे तिघेही मित्र काउंटरच्या जवळ उभे होते.​त्याच वेळी भिंगार येथील एक १६ वर्षांचा अल्पवयीन मुलगा हॉटेल मॅनेजरसोबत पैशाच्या कारणावरून जोरदार वाद घालत होता. हा वाद वाढत चालल्याचे पाहून तिथे उभा असलेल्या सागर धोत्रे याने सामाजिक भावनेतून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.सागर अत्यंत शांतपणे त्या मुलाला म्हणाला, “मित्रा, कशाला वाद करतो, त्यांचे पैसे देऊन टाक आणि वाद मिटव.​सागरने दिलेल्या या सल्ल्यामुळे तो अल्पवयीन मुलगा प्रचंड संतापला. “तू मध्ये बोलणारा कोण?” असे म्हणत त्याने सागरला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पाहता पाहता हा वाद कमालीचा विकोपाला गेला. रागाच्या भरात त्या अल्पवयीन मुलाने आपल्याजवळ लपवून ठेवलेला तीक्ष्ण चाकू बाहेर काढला.​काही समजण्याच्या आत त्याने आधी मध्यस्थी करणाऱ्या निलेश चावरे याच्या गळ्यावर चाकूने सपासप वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर त्याने तोच रक्ताळलेला चाकू सागर धोत्रे याच्या छातीत थेट खुपसला.​एक जागीच रक्ताच्या थारोळ्यात,दुसरा गंभीर

​हा हल्ला इतका भीषण होता की,छातीत चाकू घुसल्यामुळे सागर धोत्रे हा जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि बेशुद्ध झाला.हॉटेलमध्ये रक्ताचा सडा पडल्याचे पाहून एकच पळापळ झाली. घटनेनंतर आरोपी अल्पवयीन मुलगा तिथून पसार झाला.

​उपस्थितांनी तातडीने दोन्ही जखमींना रुग्णालयात हलवले. जखमी निलेश चावरे याला एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.तर सागर धोत्रे याला सरकारी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तपासून त्याला उपचारापूर्वीच 'मृत' घोषित केले.

No comments