adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सरस्वती विद्यामंदिरात प्रवेशोत्सव उत्साहात; बँडच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

 सरस्वती विद्यामंदिरात प्रवेशोत्सव उत्साहात; बँडच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; मान्यवरांकडून ...

 सरस्वती विद्यामंदिरात प्रवेशोत्सव उत्साहात; बँडच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

व्यास प्रसादिक एज्युकेशन सोसायटी संचलित सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, यावल येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

प्रवेशोत्सव कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत सराफ, मुख्याध्यापक तथा प्राचार्य बी. सी. ठाकूर, संचालक बी. पी. वैद्य, ज्येष्ठ शिक्षक एन. डी. भारुडे, दीपक पाटील यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रवेशोत्सवानिमित्त बँड पथकाच्या वादनासह विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

शालेय परिपाठानंतर विद्यार्थ्यांमधून प्रातिनिधिक स्वरूपात मनोगते व्यक्त करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक तथा प्राचार्य बी. सी. ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, शिस्त, गुणवत्ता वृद्धी तसेच सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या बाबींविषयी मार्गदर्शन केले. शैक्षणिक यशासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, वेळेचे नियोजन आणि सकारात्मक दृष्टीकोन यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

अध्यक्षीय भाषणात संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत सराफ यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक, सांस्कृतिक व सहशालेय उपक्रमांचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नरेंद्र महाले यांनी केले, तर आभार प्रदर्शन एस. बी. चंदनकार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.

No comments