adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

​विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला! बारावी परीक्षेच्या फीचे पैसे हडपणाऱ्या लिपिकावर गुन्हा दाखल; अहिल्यानगर मध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस

 ​विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला! बारावी परीक्षेच्या फीचे पैसे हडपणाऱ्या  लिपिकावर गुन्हा दाखल; अहिल्यानगर मध्ये  धक्कादायक प्रकार उघडकीस  ...

 ​विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला! बारावी परीक्षेच्या फीचे पैसे हडपणाऱ्या  लिपिकावर गुन्हा दाखल; अहिल्यानगर मध्ये  धक्कादायक प्रकार उघडकीस 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

​अहिल्यानगर :- शिक्षणाचे पवित्र मंदिर मानल्या जाणाऱ्या शाळेतच विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील गांधी मैदान परिसरातील नामांकित 'प्रगत विद्यालयात' बारावी बोर्डाच्या परीक्षेची फी भरण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांची केवळ आर्थिकच नव्हे,तर मोठी शैक्षणिक फसवणूक करण्यात आली आहे.याप्रकरणी विद्यालयाचा लिपिक लुहाण पहिलाजरॉय याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सर्जेपुरा येथील किराणा व्यावसायिक अमोल टिल्लु गायकवाड यांनी याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. आरोपी लिपिक लुहाण पहिलाजरॉय याने फिर्यादी गायकवाड यांचा मुलगा आणि इतर चार विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन केला होता.बारावी बोर्डाची एटीकेटी (ATKT) परीक्षा देण्यासाठी या विद्यार्थ्यांनी लिपिकाकडे परीक्षेचे शुल्क रोख (Cash) स्वरूपात जमा केले होते.​लबाड लिपिकाने विद्यार्थ्यांकडून पैसे तर घेतले, मात्र ते ऑनलाइन पद्धतीने बोर्डाकडे जमा केलेच नाहीत. एकूण ३ हजार १५० रुपयांचा अपहार करून त्याने हे पैसे स्वतःकडेच ठेवले.बोर्डाकडे फी जमा न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही, ज्यामुळे त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. काही रुपयांच्या हव्यासापोटी लिपिकाने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ मांडल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.अशा फसवणुकीने 

​हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांनी तातडीने पावले उचलत कोतवाली पोलीस ठाणे गाठले.अमोल गायकवाड यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी लिपिक लुहाण पहिलाजरॉय विरुद्ध फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.​सध्या कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.या फसवणुकीत आणखी काही विद्यार्थ्यांचे पैसे बुडाले आहेत का,याचाही शोध आता पोलीस घेत आहेत.शाळेतील लिपिकानेच असा कारनामा केल्यामुळे पालकांनी फी भरताना थेट बँकेत किंवा ऑनलाइन अधिकृत पोर्टलवरच भरावी,असे आवाहन केले जात आहे.

No comments