बदली होऊनही पोलीस अधिकाऱ्यांना नगर जिल्ह्याचा मोह सुटेना.. सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर:- जिल्ह्याबाहे...
बदली होऊनही पोलीस अधिकाऱ्यांना नगर जिल्ह्याचा मोह सुटेना..
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- जिल्ह्याबाहेर बदल्या होऊनही पोलीस अधिकाऱ्यांना नगर जिल्ह्याचा मोह सुटत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.नगर जिल्ह्यातच पुन्हा राहण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांकडून जोरदार 'फिल्डिंग' लावली जात आहे.१५ दिवस उलटले तरीही हे अधिकारी जिल्ह्यात ठाण मांडूनच आहे.नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) संजय येनपुरे यांनी नाशिक विभागांतर्गत (रेंज) १४ सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या अधिकाऱ्यांचे गत ३१ मे रोजी गॅझेट प्रसिद्ध केले होते.त्यामध्ये काहींना जिल्ह्यातच मुदतवाढ देण्यात आली,तर काही अधिकाऱ्यांना जिल्ह्याबाहेर बदली देण्यात आली आहे.मात्र,बदलीचे गॅझेट प्रसिद्ध होऊन १५ दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी बदली झालेले अधिकारी जिल्हा सोडायला तयार नाहीत,अशी परिस्थिती आहे.नुकतेच पदभार स्वीकारलेले पोलीस अधीक्षक मुम्माका सुदर्शन यांनी पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करून पोलीस ठाणेदारांच्या नेमणुका केल्या आहेत.ज्या अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे त्यांनी लवकरच बदली झालेल्या ठिकाणी चार्ज घेऊन काम करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र तसे होताना दिसत नाहीये.

No comments