adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मलकापुरात संत मुक्ताबाई पालखीचे भक्तीमय वातावरणात स्वागत; वारकऱ्यांसाठी भव्य 'शरबत वाटप' संपन्न

मलकापुरात संत मुक्ताबाई पालखीचे भक्तीमय वातावरणात स्वागत; वारकऱ्यांसाठी भव्य 'शरबत वाटप' संपन्न ​मलकापूर प्रतिनिधी : अमोल बावस्कर  (...

मलकापुरात संत मुक्ताबाई पालखीचे भक्तीमय वातावरणात स्वागत; वारकऱ्यांसाठी भव्य 'शरबत वाटप' संपन्न



​मलकापूर प्रतिनिधी : अमोल बावस्कर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

आदिशक्ती संत मुक्ताबाई यांच्या पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या पावन पालखी सोहळ्याचे मलकापूर नगरीत अतिशय उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात आगमन झाले. "माऊली... माऊली..." आणि "जय हरी विठ्ठल" च्या जयघोषाने संपूर्ण बुलडाणा रोड परिसर दुमदुमून गेला होता.

​या मंगलमयी प्रसंगी पायी चालणाऱ्या वारकरी-भक्तांच्या सेवेसाठी 'श्री संत गजानन महाराज उत्सव सेवा ट्रस्ट' आणि 'गजानन महाराज भक्त मंडळ, मलकापूर' यांच्या वतीने बुलडाणा रोडवरील 'श्रीहरी एजन्सी' समोर भव्य 'शरबत वाटप' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

​सायंकाळी ठीक ६:०० वाजता पालखीचे आगमन होताच भाविकांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी कडक उन्हात आणि प्रवासाच्या थकव्यात विसावलेल्या हजारो वारकऱ्यांना आयोजकांच्या वतीने थंडगार शरबतचे वाटप करून तृप्त करण्यात आले. "वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा" या भावनेने गजानन महाराज भक्त मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने हे वाटप केले.

​पालखीचे दर्शन घेण्यासाठी आणि वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी मलकापूर परिसरातील माता-भगिनी,अबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण परिसर भगव्या पताका आणि टाळ-मृदंगाच्या गजरानी भक्तीरसात न्हाऊन निघाला होता.

​हा सेवा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री संत गजानन महाराज उत्सव सेवा ट्रस्ट आणि भक्त मंडळाच्या सर्व सदस्यांनी व स्थानिक नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले. वारकऱ्यांनीही या सुयोग्य नियोजनाचे कौतुक करत आयोजकांना आशीर्वाद दिले.

No comments