रक्तदानासाठी पुढाकार; स्वाती देशमुख खर्चे यांचा समाजापुढे आदर्श अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर : समाजसेवेची जा...
रक्तदानासाठी पुढाकार; स्वाती देशमुख खर्चे यांचा समाजापुढे आदर्श
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर : समाजसेवेची जाणीव ठेवत रक्तदानासाठी पुढाकार घेणाऱ्या स्वाती देशमुख खर्चे यांनी सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे माऊली फाऊंडेशन मलकापूर ग्रुप माध्यमातून सेवाकार्य करत रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने त्यांनी रक्तदानासाठी रक्तदात्यांना प्रेरित केले.मलकापूर तालुक्यासह बुलडाणा, जळगाव,अकोला जिल्ह्यात गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची नेहमी तडमड असते स्वाती देशमुख खर्चे यांच्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले असून,अधिकाधिक युवकांनी रक्तदान चळवळीत सहभागी व्हावे,असे आवाहनही करण्यात आले. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचत असून रक्तदानाबाबत जनजागृती होण्यास मदत होत आहे.

No comments