पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त मलकापूर येथे इंडियन एक्सलन्स अवॉर्ड वितरण सोहळा संपन्न महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त मलकापूर येथे इंडियन एक्सलन्स अवॉर्ड वितरण सोहळा संपन्न
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सत्कार
मलकापूर प्रतिनिधी: अमोल बावसकर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
दैनिक अहिल्याराज व हिंदी मराठी पत्रकार संघ द्वारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती व दैनिक अहिल्या राज वर्धापन दिवस निमित्ताने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन एक्सलन्स अवार्ड 2026 चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रस्ताव ऑनलाइन मागवण्यात आले होते.
यावेळी 390 प्रस्तावांपैकी निवड करून 78 मान्यवरांना इंडियन एक्सलन्स पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला. इंडियन एक्सलन्स अवार्ड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशांत भाई वानखेडे शिक्षण सभापती हे होते कार्यक्रमाचे उद्घाटक धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ हे होते. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बाळासाहेब दामोदर उद्द्योजक, प्रा. वैभव आढाव सर प्राचार्य फार्मसी कॉलेज, वीरसिंह दादा राजपूत ज्येष्ठ पत्रकार, डॉ. प्रदीप गायकी वाहतूक नियंत्रक , दिलीप आढाव प्राचार्य विद्या विकास विद्यालय, एड. नेमीचंद धूत ज्येष्ठ विधीज्ञ, चंद्रकांत वर्मा समाजसेवक हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व प्रथम महिला संपादक तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमात पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक, राजकीय, कला, वैद्यकीय, वकील, उद्योजक , अभिनय, अशा अनेक क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तींचा सत्कार इंडियन एक्सलन्स अवार्ड 2026 देऊन करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला पत्रकार राजेश इंगळे, समाधान सुरवाडे, संदीप सावजी, विजय भगत, मनोज पाटील, स्वप्निल आकोटकर , कृष्णा मेहसरे, अशोक रावणकार, कैलास काळे, विजय वर्मा, उल्हास शेगोकार, अनिल गोटे, श्रीकृष्ण भगत, राजू घाटे, गोविंद रहाट, गणेश सुशीर, निलेश सोनवणे, गणेश नेमाडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. प्रकाश थाटे, प्रमोद हिवराळे, विनायक तळेकर , सुधाकर तायडे, रवींद्र गव्हाळे ,नथूजी हिवराळे, मयूर लड्डा ,सय्यद ताहेर ,शेख निसार, देवेंद्र जयस्वाल, आत्माराम मोरे, कळू फुलपगारे, प्रशांत खंडागळे, किशोर सोनवणे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत सुरवाडे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण तायडे यांनी केले.
आगामी काळात येणाऱ्या पावसाळा ऋतू लक्षात घेता हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार बांधवांसाठी खास संरक्षण म्हणून पावसाळी छत्री सप्रेम भेट देऊन पत्रकार बांधवांचा सत्कार यावेळी करण्यात आला.


No comments