adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

डीएपी खताचा संरक्षित साठा तातडीने खुला करा; अन्यथा आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कृषी विभागाला इशारा; खरीप हंगामाच्या तोंडावर खतटंचाईने शेतकरी चिंतेत

 डीएपी खताचा संरक्षित साठा तातडीने खुला करा; अन्यथा आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कृषी विभागाला इशारा; खरीप हंगामाच्या तोंडावर खतटंचाईने...

 डीएपी खताचा संरक्षित साठा तातडीने खुला करा; अन्यथा आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कृषी विभागाला इशारा; खरीप हंगामाच्या तोंडावर खतटंचाईने शेतकरी चिंतेत


 मलकापूर प्रतिनिधी : अमोल बावसकर 


(संपादक : हेमकांत गायकवाड )


खरीप हंगामाच्या तोंडावर निर्माण झालेल्या डीएपी खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडे उपलब्ध असलेला संरक्षित साठा शेतकऱ्यांसाठी तात्काळ खुला करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

                       यासंदर्भात संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांच्या नेतृत्वाखाली कृषी विभागाला निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, खरीप हंगामासाठी शेतकरी पेरणीपूर्व तयारीत व्यस्त असताना बुलढाणा जिल्ह्यासह मलकापूर तालुक्यात डीएपी खताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. बाजारात आवश्यक प्रमाणात खत उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असून पेरणीचे नियोजन विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे.

                   डीएपी खताच्या कमतरतेचा थेट परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने आपल्या ताब्यातील संरक्षित साठा तातडीने खुला करून तो बाजारात उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या मागणीचा विचार करून प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. उद्भवणाऱ्या परिस्थितीस सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही संघटनेने दिला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे, तालुका अध्यक्ष गोपाल सातव, शुभम नेमाने, दीपक किनगे व निंबाजी तायडे उपस्थित होते.

No comments