आदिवासी कोळी बहुउद्देशीय शिखर संस्थेच्या वतीने संपूर्ण समाजाची भव्य सभा व समाज मेळावा आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय..! रावेर प्रतिनिधी...
आदिवासी कोळी बहुउद्देशीय शिखर संस्थेच्या वतीने संपूर्ण समाजाची भव्य सभा व समाज मेळावा आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय..!
रावेर प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
आदिवासी कोळी बहुउद्देशीय शिखर संस्था रावेरच्या संचालक मंडळाची विशेष बैठक दि.14 जून 2026 रोजी तांदलवाडी येथे उत्साहात संपन्न झाली.या बैठकीत तालुक्यातील विविध सामाजिक समस्या,संस्थेचा प्रसार व प्रचार तसेच आगामी काळातील नियोजन या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजातील एकोपा अधिक दृढ करण्यासाठी संस्थेच्या वतीने संपूर्ण समाजाची भव्य सभा व समाज मेळावा आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
या आगामी मेळाव्यात समाजासमोरील विविध प्रश्न, युवक व महिलांचे सक्षमीकरण, शैक्षणिक प्रगती, रोजगाराच्या संधी, सामाजिक ऐक्य तसेच समाजहिताच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले.
बैठकीस संस्थेचे अध्यक्ष मनोहर पंडीत कोळी (सुलवाडी), उपाध्यक्ष विनोद रामचंद्र कोळी (शिवा भाई G) (पुनखेडा), सचिव योगेश्वर विश्वनाथ कोळी (तांदलवाडी), सहसचिव सुभाष सुकदेव सपकाळे (सुनोदा), खजिनदार विक्की कृष्णा कोळी (चोरवड), कार्याध्यक्ष भूषण प्रकाश तायडे (रावेर), प्रसिद्धी प्रमुख शुभम सुनिल कोळी (निंबोल), सल्लागार अशोक रामदास कोळी (वाघोदा), किरण सोपान कोळी (अटवाडा), गोपाळ सुधाकर कोळी (खिरवड), प्रमुख सल्लागार विनोद रामदास कोळी (नेहता) तसेच सदस्य संतोष वामन सपकाळे (सिंगत), हरीलाल रमेश कोळी (कांडवेल), संदीप तुकाराम महाले (निभोरा स्टेशन), विजय देविदास कोळी (अजनाड), सुपडू दोधू मोरे (थोरगव्हाण), समाधान सदाशिव कोळी (पातोडी), ईश्वर शालीग्राम कोळी (चिनावल), विनोद मिठाराम कोळी (खिडी), जयराम चिंतामण कोळी (ऐनपूर), शरद सुपडू कोळी (आंदलवाडी), उमेश मोहन कोळी (मागलवाडी) व ज्ञानेश्वर पुंडलिक खवले (तांदलवाडी) दिपक तायडे वाघोदा, आकाश कोळी, अतुल सपकाळे पुनखेडा, जितेंद्र सोनार वाघोदा,आदी संचालक मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीचे आयोजन सचिव योगेश्वर विश्वनाथ कोळी (तांदलवाडी) यांनी केले. बैठकीनंतर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
समाजाच्या प्रगतीसाठी सर्व समाज बांधवांनी आगामी भव्य समाज मेळाव्यास उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.


No comments